Weight Loss : रक्तदानाने झटक्यात होतात कॅलरीज बर्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weight Loss

Weight Loss : रक्तदानाने झटक्यात होतात कॅलरीज बर्न

देशात ठिक ठिकाणी रक्तदान शिबिर राबवल्या जाते आणि सर्व स्तरातून रक्त दान करण्यास प्रोत्साहन केले जाते पण अनेक लोका रक्त दान करण्यास घाबरतात. पण जर तुम्ही रक्त दानाचे फायदे वाचाल तर अवाक् व्हाल. चला तर जाणून घेऊया. (blood donation helps to burn calories read story )

1. हार्टचे आरोग्य सुधारते :-

रक्तदान केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते . शिवाय , हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो . रक्तामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यास हृदयाला यामुळे नुकसान होण्याचा धोका असतो , असे म्हटले जाते . नियमित स्वरुपात रक्तदान केल्यास अतिरिक्त लोह नियंत्रणात राहण्यास मदत होते . यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

2. रेड ब्लड सेल्समध्ये वाढ होते :-

रक्तदान केल्यानंतर तुमचे शरीर रक्ताची कमतरता भरुन काढण्याचे कार्य सुरू करू लागते . यादरम्यान , शरीरात लाल रक्तपेशी अधिक प्रमाणात निर्माण होतात . यामुळे तुमचे आरोग्य सुधारू लागते आणि शारीरिक कार्य अधिक चांगल्या पद्धतीनं होतात.

हेही वाचा: Organ Donation : पतीच्या अवयव दानाचा निर्णयातून वाचविले तीन प्राण

3. वजन कमी होते :-

रक्तदानामुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन घटण्यासही मदत होऊ शकते. शरीरात लाल रक्तपेशींचा स्तर योग्य प्रमाणात येण्यासही मदत होते . यादरम्यान , पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम करुन वजन नियंत्रण आणले जाऊ शकते . पण म्हणून वजन कमी करण्यासाठी रक्तदान करणे हा योग्य मार्ग ठरू शकत नाही .

रक्तदानाची प्रक्रिया केवळ निरोगी आरोग्य राखण्याचे माध्यम आहे . वजन घटवण्याच्या योजनेतील हिस्सा नाही . त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रक्तदान करावे.

4. कॅन्सरचा धोका कमी :-

रक्तदान केल्यानं शरीरात अधिक प्रमाणात असणारे लोह नियंत्रणात आणण्यास मदत होते . यामुळे कॅन्सरचा धोकादेखील कमी होतो.

हेही वाचा: Organ Donation : बारामतीत झाले पहिले देहदान...ऐतिहासिक क्षणाची नोंद...

5. हेल्दी लाईफ :-

रक्तदानामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते , रक्तदाबही नियंत्रणात राहतो .

6. हेल्थ चेकअप :-

आरोग्यदायी फायद्यांव्यतिरिक्त रक्तदान प्रक्रियेमध्ये रक्तदानापूर्वी तुमचे रक्त आणि आरोग्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी तपासली जाते , संसर्ग , आजारांची तपासणी केली जाते . रक्तचाचणीद्वारे एखादी व्यक्ती रक्तदान करण्यास सक्षम आहे की नाही , याची माहिती मिळते . यामुळे नियमित स्वरुपात रक्तदानामुळे तुम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्यरितीने देखभालही करू शकता.