‘ए मेरे वतन के लोगों’ सारखी गाणी गाऊन होणार ब्रेन स्ट्रोकवर उपचार, एम्सची ही नवीन थेरपी कशी काम करणार?

दिल्लीचे एम्स रूग्णालय आता ब्रेन स्ट्रोकच्या रूग्णांना भारतीय संगीताची धून वापरून बोलायला आणि ऐकायला शिकवणार आहेत. एम्स दिल्ली आणि आयआयटी दिल्ली एकत्रितपणे यावर काम करत आहेत.
Brain stroke
Brain stroke esakal

Brain stroke : दिल्लीचे एम्स रूग्णालय आता ब्रेन स्ट्रोकच्या रूग्णांना भारतीय संगीताची धून वापरून बोलायला आणि ऐकायला शिकवणार आहेत. एम्स दिल्ली आणि आयआयटी दिल्ली एकत्रितपणे यावर काम करत आहेत.

या म्युझिक थेरपीद्वारे रूग्णांवर उपचार केले जातील. एम्सच्या मते ही म्युझिक थेरपी रूग्णांच्या उपचारांमध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे.

'टाईम्स ऑफ इंडियाच्या' एका रिपोर्टनुसार, दिल्लीच्या एम्स रूग्णालयाच्या डॉ. दिप्ती विभा यांनी सांगितले की, जेव्हा रूग्णाला ब्रेन स्ट्रोक्स येतो, तेव्हा रूग्ण ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता गमावतो.

या स्थितीमध्ये म्युझिक थेरपीद्वारे त्या रूग्णांना भारतीय संगीताद्वारे गाणे गुणगुणायला आणि बोलायला शिकवले जाणार आहे. त्या पुढे म्हणाल्या की, भारतात पहिल्यांदाच अफिझियाने (Afizia) पीडित असलेल्या रूग्णांसाठी म्युझिक थेरपीचे मॉड्यूल तयार केले जात आहे. या संदर्भात एम्सचा न्यूरोलॉजी विभाग आयआयटी दिल्लीची मदत घेत आहे.

Brain stroke
Brain Stroke Risk: या सवयी असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका सर्वाधिक, लगेच सवयी बदला, नाहीतर...

अफिझिया काय आहे?

जेव्हा एखाद्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक्स येतो, त्यानंतर जवळपास २१ ते ३८ टक्के रूग्णांना अफिझियाचा त्रास होतो. अफिझियाच्या या स्थितीमध्ये संबंधित रूग्णाच्या मेंदूचा डावा भाग काम करणे थांबवते. खरे तर मेंदूच्या या डाव्या भागामुळेच व्यक्ती बोलते आणि विविध गोष्टी समजून घेते. यासोबतच लोकांसमोर आपल्य मनातील भावना व्यक्त करते.

अफिझियाने पीडित असलेल्या रूग्णाला एक छोटासा शब्दही बोलता येत नाही. त्यामुळे, या समस्येपासून रूग्णांना मुक्त करण्यासाठी एम्सचा न्यूरोलॉजी विभाग यावरील संगीत थेरपीवर काम करत आहे. विशेष म्हणजे परदेशात अशा रूग्णांसाठी म्युझिक थेरपी वापरली जाते.

म्युझिक थेरपीचे मॉड्यूल

सध्या आयआयटी दिल्ली आणि एम्स दिल्ली एकत्रितपणे यासंदर्भात रूग्णांवर संशोधन करत आहेत. तसेच, या म्युझिक थेरपीचे मॉड्यूल बनवण्यात ते व्यस्त आहेत.

ब्रेन स्ट्रोक अफिझियाने ग्रस्त असलेल्या ६० रूग्णांवर एक अभ्यास करण्यात येणार आहे. ज्यामध्ये पहिल्या ३० रूग्णांना संगीत थेरपी दिली जाईल आणि उर्वरित ३० रूग्णांवर स्टॅंडर्ड उपचार (प्रचलित पद्धतीनुसार) केले जातील. त्यानंतर, दर ३ महिन्यांनी त्यांच्यातील बदल लक्षात घेतले जातील आणि याचे परिणाम सादर केले जातील.

कशी दिली जाणार ही संगीत थेरपी ?

खरे तर अफिझियामध्ये रूग्णाच्या मेंदूचा डावा भाग अजिबात काम करत नाही मात्र, उजवा भाग पूर्णपणे निरोगी राहतो, असे डॉ. विभा यांनी सांगितले. तसेच, उजवा भाग निरोगी असल्यामुळे या स्थितीमध्ये रूग्णाला संगीताचे सूर देखील ऐकू येतात. शिवाय, म्युझिक थेरपीमुळे रूग्ण गाणे देखील गुणगुणतो.

या म्युझिक थेरपीच्या मदतीने रूग्णाची उजवी बाजू सक्रिय करून त्याला बोलायला आणि संगीताचे सूर समजायला शिकवले जाते. या थेरपीमध्ये सर्वात आधी रूग्णासमोर छोट्या संगीताचे सूर ऐकवले जातात. असे सूर जे रूग्णाला केवळ समजू शकत नाही तर ते गुणगुणण्यासाठी देखील सक्षम आहेत.

या संगीत थेरपीमध्ये ‘रघुपती राघव राजा राम’ किंवा ‘ये मेरे वतन के लोंगो’ सारख्या गाण्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. ही दोन्ही गाणी जवळजवळ प्रत्येक भारतीय व्यक्तीला माहित आहे आणि ही गाणी ऐकली आहेत.

Brain stroke
Cancer Free : स्वदेशी CAR-T सेल थेरपीमुळे कर्करोगमुक्त झाला भारतातील पहिला रूग्ण, उपचारांचा खर्च ४ कोटींवरून आला ४० लाखांवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com