Weightloss Tips : काय सांगता! वांगी खाऊन वजन कमी करता येतं? जाणून घ्या योग्य पध्दत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weightloss Tips

Weightloss Tips : काय सांगता! वांगी खाऊन वजन कमी करता येतं? जाणून घ्या योग्य पध्दत

Brinjal Good for Weight Loss : वढतं वजन किंवा वजन कमी करण्याचं टेंशन बहुतेकांची रात्रीची झोप उडवते. आपलं वजन कसं कमी करायचं यासाठी लोक बरेच उपाय करत असतात. त्यात अमुक पदार्थ खायचे नाही, तमुक खायचे नाही. त्यातही वांगी हा अनेकांसाठी अत्यंत नावडता पदार्थ म्हटलं तर हरकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? हिच वांगी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतात.

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आणि व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. साधारणपणे, बहुतेक लोकांमध्ये लठ्ठपणा वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कॅलरी बर्न करण्यापेक्षा जास्त कॅलरी वापरणे. जास्त कॅलरीजचे सेवन केल्यास ते शरीरात चरबीच्या रूपात जमा होऊ लागते आणि लठ्ठपणा झपाट्याने वाढू लागतो.

हेही वाचा: Weight Loss : वेट लॉस करणाऱ्यांनी नाश्त्यात बिनधास्त खावे आप्पे

तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल, तर अशा भाज्यांचा आहारात समावेश करा, ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहील आणि वजनही नियंत्रित राहील. वांगी ही एक अशी भाजी आहे ज्याचा वापर लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी सहज करता येतो.

हेही वाचा: Weight Loss Tips : पोटाच्या ढेरीकडे बघून वजन कमी नाही होणार; पहा काय आणि किती खावं?

वांग्यातले पोषक तत्व

 • वांग्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते.

 • १०० ग्रॅम वांग्यामध्ये २४ कॅलरीज,

 • ४ ग्रॅम कर्बोदके,

 • १.५ ग्रॅम फायबर,

 • १.४ ग्रॅम प्रथिने

 • चरबीचे प्रमाण अत्यंत कमी असते.

 • फायबर

 • व्हिटॅमिन सी

 • बीटा-कॅरोटीन

हेही वाचा: Weight Gain Reasons: लठ्ठपणाची ५ प्रमुख कारणे

वांगी खाण्याचे फायदे

 • वांगी त्वचा आणि हाडांसाठी देखील खूप उपयुक्त आहेत.

 • क्रेविंग्स नियंत्रित करते आणि भूक शांत करते.

 • शरीराला आवश्यक ऊर्जा देण्यासाठी या भाजीमध्ये मर्यादित कॅलरीज असतात ज्यामुळे वजन नियंत्रित राहते.

 • वांग्याच्या सेवनाने रक्तदाब सहज नियंत्रित ठेवता येतो. सोडियम युक्त वांगी बीपीच्या रुग्णांवर औषधाप्रमाणे काम करतात.

 • वांग्यात नसुनिन (nasunin) नावाचे रसायन असते जे शरीरात अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. इतर भाज्यांपेक्षा ते जास्त फायदेशीर आहे.

 • फायबर युक्त वांगी बद्धकोष्ठतेपासून आराम देते आणि शरीर निरोगी ठेवते.

 • त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी आहे. याच्या सेवनाने रक्तातील साखर वाढण्याचा धोका नाही.

 • याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते.