Brinjal Side Effects : 'हे' 5 आजार असेल तर अजिबात वांगी खाऊ नका, नाहीतर थेट पोहोचाल रूग्णालयात...

इतके फायदे असूनही वांग्याचे सेवन प्रत्येकासाठी फायदेशीर नाही
Brinjal Side Effects
Brinjal Side Effectsesakal

Brinjal Side Effects : अनेकांना भाजीमध्ये वांगी खायला आवडतात. तसेच वांगी कुठल्याही ऋतूत स्वस्त दरात उपलब्ध असते. हिवाळ्यात वांग्याची भाजी किंवा भरीत खाण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. थंडीच्या दिवसात याचा वापर केल्यास वजन कमी होण्यासही मदत होते. यासोबतच रक्तातील साखर आणि हृदयविकारही नियंत्रणात राहतात. इतके फायदे असूनही वांग्याचे सेवन प्रत्येकासाठी फायदेशीर नाही.

आयुर्वेदानुसार हे ५ आजार ज्यांना आहेत, त्या रुग्णांनी चुकूनही वांग्याचे सेवन करू नये, अन्यथा त्यांची प्रकृती बिघडायला वेळ लागणार नाही. चला जाणून घेऊया कोणते आहेत ते 5 आजार.

या लोकांनी वांग्याचे सेवन करू नये

किडनीस्टोन

ज्या लोकांना पोटात खड्यांची समस्या आहे, त्यांनी चुकूनही वांग्याचे सेवन करू नये. याचे कारण म्हणजे वांग्यात ऑक्सलेट नावाचे तत्व आढळून येते, त्यामुळे स्टोनची समस्या आणखी वाढते. त्यामुळे अशा लोकांनी ते अजिबात सोडले तर बरे होईल.

रक्ताची कमी असलेल्यांनी

ज्या लोकांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे, त्यांच्यासाठी वांगी खाणे देखील हानिकारक असू शकते (वांग्याचे दुष्परिणाम). याच्या सेवनाने शरीरात लोहाची कमतरता वाढते. त्यामुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढत असते.

अॅलर्जी असणाऱ्यांनी

कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असलेल्या व्यक्तीने वांगी खाणे टाळावे. वांग्यामध्ये असे अनेक घटक असतात, जे अॅलर्जीची समस्या आणखी वाढवतात. अशा स्थितीत त्वचा किंवा इतर प्रकारची अॅलर्जी असलेल्या रुग्णाने वांगी खाल्ल्यास त्याच्या समस्या वाढू शकतात.

Brinjal Side Effects
fruits and vegetables: या 'सहा' फळभाज्या तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यात करीत तुमची मदत..

पचनक्रिया कमकुवत असणाऱ्यांनी

ज्या लोकांचे पोट अनेकदा खराब असते किंवा ज्यांना गॅस-ऍसिडिटीची समस्या असते. त्यांनी वांगी खाऊ नयेत, त्याचा दुष्परिणाम तुम्हालाच भोगावा लागू शकतो. असे केल्याने त्यांच्या पोटाचा त्रास वाढू शकतो आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. (Health)

डोळ्यांची जळजळ

डोळे जळणाऱ्या लोकांसाठी वांग्याची भाजी किंवा भरीत खाणे हानिकारक मानले जाते. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात वेदना, सूज आणि जळजळ होण्याची समस्या वाढू शकते. काही वेळा डोळ्यांची दृष्टीही कमी होऊ लागते. त्यामुळे त्याचा वापर टाळला पाहिजे. (Vegetable)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com