Calcium rich food: आपल्या पुर्ण 206 हाडांना लागणारे पुरेसे कॅल्शियम देतील 'या' सहा गोष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bone and Joint Day

Calcium rich food: आपल्या पुर्ण 206 हाडांना लागणारे पुरेसे कॅल्शियम देतील 'या' सहा गोष्टी

आज 4 ऑगस्ट म्हणजे आज Bone and Joint Day आहे. या दिवसाच्या निमित्तानं ऑर्थोपेडिक डॉक्टरांसोबत संवाद साधून त्यांना हाडे मजबूत राहण्यासाठी काय करावे असा प्रश्न विचारला असता त्यांनी काही गोष्टी आहारात समाविष्ट करण्यासाठी सांगितल्या आहे.

या कोणत्या गोष्टी आहे याचीच सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. तुमच्या शरीरातील हाडे मजबूत राहण्यासाठी संतुलित आहार खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या शरीरातील हाडे निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने पुरेसे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आवश्यक असते. तुम्ही जर का नियमितपणे संतुलित आहार घेतला तर हाडे मजबूत राहण्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व मिळण्यास मदत होऊ शकते.

कॅल्शियम हाडांसाठी आवश्यक जीवनसत्व आहे. सामान्य परिस्थितीत, प्रौढांना दररोज 700 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. हे कॅल्शियम मिळण्यासाठी तज्ञ दररोज संतुलित आहार घेण्याचा सल्ला देतात. दूध, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, ब्रोकोली, कोबी आणि भेंडी इत्यादी, सोयाबीन, मासे हे कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत.

● केळी:

केळी मॅग्नेशियमचा सर्वोत्तम स्रोत आहे. शरीरात मॅग्नेशियम हाडे आणि दातांच्या संरचनेसाठी आवश्यक असणारे जीवनसत्व आहे. तुम्हाला जर का तुमचे हाडे मजबूत ठेवायचे असतील तर तुम्ही दररोज केळीचे सेवन केले पाहिजे. कमकुवत हाडांची समस्या दूर करण्यासाठी दररोज एक केळी प्रभावी उपाय ठरू शकते.

● पालक

कॅल्शियम भरपूर असलेल्या हिरव्या पालेभाज्या दात आणि हाडे मजबूत ठेवण्यात मदत करतात. एक कप उकडलेली पालक भाजी तुमच्या शरीराच्या दैनंदिन गरजेच्या २५ टक्के कॅल्शियम पुरवू शकते. फायबर समृद्ध असलेल्या पालकच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए आणि लोह देखील मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या शरीराला आणि हाडांना चांगले पोषण मिळू शकते.

● नट्स

नट्समध्ये कॅल्शियम असते, सोबतच त्यात मॅग्नेशियम आणि फॉस्फरस देखील असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. मॅग्नेशियम हाडांमध्ये कॅल्शियम शोषण्यास मदत करते. जर तुम्हाला तुमच्या वयानुसार हाडे मजबूत ठेवायची असतील तर नट्स चांगले पोषण देऊ शकतात.

● दुधजन्य पदार्थ

दूध, दही आणि चीज यांसारख्या दुधजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते. जे हाडांच्या मजबुती आणि संरचनेसाठी सर्वात महत्वाचे असे जीवनसत्व आहे. एक कप दूध आणि एक कप दही हे कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहेत. म्हणून सकाळी दह्याचे ताक करुन तुम्ही ते घेऊ शकता आणि रात्री झोपतांना एक कप दूध तुम्ही घेऊ शकता.

● संत्री

तुम्हाला माहित आहे का की ताज्या संत्र्याचे ज्यूस शरीराला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी प्रदान करतो, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. संत्र्याच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्यास ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असेही सांगितले जाते.

● व्हिटॅमिन डी

आपल्या आहारातून योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळणे आपल्याला कठीण जाते. म्हणूनच मजबूत हाडांसाठी आपल्याला सूर्यप्रकाशापासून हे जीवनसत्व डी मिळू शकते. पहाटे कोवळ्या उन्हात फिरणे हा उत्तम पर्याय असू शकतो. आपण दररोज सूर्यप्रकाशात बसून सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळवू शकतो. व्हिटॅमिन डी असलेली औषधे देखील बाजारात उपलब्ध आहेत, परंतु त्यांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.

तुम्ही जर का तुमच्या आहारात या कॅल्शियम युक्त गोष्टींचा समावेश केला तर तुम्हाला वृद्धापकाळापर्यंत कोणत्याही आधाराची गरज भासणार नाही.