Cancer Treatment: केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी मधील फरक काय? कोणत्या वेळी कोणाची निवड करावी ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

What Is The Difference Between Chemotherapy And Radiation Therapy: केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीमधील फरक, प्रत्येकाची निवड केव्हा करायची आणि कर्करोगाच्या काळजीबद्दल तज्ञ अंतर्दृष्टी जाणून घ्या.
Chemotherapy vs Radiation Therapy: Understand the Right Cancer Treatment with Expert Advice
Chemotherapy vs Radiation Therapy: Understand the Right Cancer Treatment with Expert Advicesakal
Updated on

थोडक्यात:

  1. कॅन्सरवर मात करताना उपचारांची माहिती असणे रुग्णाच्या प्रवासाला कमी त्रासदायक बनवते.

  2. रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपी हे कॅन्सरवरील प्रसिद्ध व प्रभावी उपचार पर्याय आहेत.

  3. योग्य उपचार निवड आजाराचा प्रकार, पसरलेपण आणि रुग्णाच्या गरजांवर अवलंबून असते.

Chemotherapy and Radiation Therapy: जरी कॅन्सरवर मात करणे हा एक कठीण प्रवास असला तरीही जर एखाद्या व्यक्तीला त्याच्यावर होणार्‍या उपचारांबद्दल माहिती असेल तर तो प्रवास कमी त्रासदायक होतो. अन्य प्रचलित पर्यांयांबरोबरच रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपी हे दोन प्रसिध्द आणि यशस्वी उपचारांचे पर्याय आहेत. प्रत्येक उपचार हा कॅन्सरशी लढा देतांना आपली विशिष्ट भुमिका बजावत असतो आणि रुग्णाच्या गरजा, आजाराचा प्रकार आणि तो कसा पसरतोय यावर हे उपचार अवलंबून असतात.

केमोथेरपी म्हणजे काय ?

शरीराच्या प्रत्येक कोपर्‍यातील पोहोच

समजा जर तुमच्यावरील उपचारांचे डिझाईन हे शरीराच्या प्रत्येक कोपर्‍यात जाऊन अगदी कोपर्‍यात लपून बसलेल्या कॅन्सरच्या पेशींशी लढण्यासाठी करण्यात आले असेल, तर यामध्ये अतिशय कठोरपणे उपचार करुन रक्तात जाऊन परिणाम करतात, अशी औषधे ही ल्युकेमिया, लिम्फोमा किंवा अगदी गंभीर स्वरुपात शरीराच्या अन्य भागात पसरलेल्या कॅन्सर साठी खूपच उपयुक्त असतात.

Chemotherapy vs Radiation Therapy: Understand the Right Cancer Treatment with Expert Advice
Lung Cancer Myths: 'सिगरेट ओढत नाही, मग कर्करोग कसा?' – या ५ चुकीच्या समजुतींपासून आजच सावध व्हा!

केमोथेरपी ही वेगाने विघटीत होणार्‍या कॅन्सरची वैशिष्ट्ये असलेल्या पेशींवर परिणाम करतात. पण त्याच बरोबर काही चांगल्या पेशींना सुध्दा यामुळे नुकसान होते, विशेष करुन रक्त, पाचनसंस्थेचा मार्ग आणि केसांची मुळे, यामुळे काही आजारपणाची लक्षणे जसे, इन्फेक्शन, मळमळणे, थकवा आणि केस गळणे इत्यादींचा समावेश आहे. या समस्या असूनही सध्याच्या अत्याधुनिक अशा सपोर्टिव्ह केअर मुळे या साईड इफेक्ट्सचे व्यवस्थापन करणे, थेरपी घेत असतांना रुग्णाची जीवनशैली टिकवून ठेवण्यात सहकार्य करणे सोपे जाते.

रेडिएशन थेरपी म्हणजे काय?

दुसरीकडे रेडिएशन थेरपी ही टार्गेटेड ट्रिटमेंट असते. हे उपचार शरीराच्या अगदी थोडक्या भागातील ट्युमरवर उपचार करण्यासाठी केले जातात, विशेषकरुन ब्रेन ट्युमर्स, प्रोस्टेट्स किंवा अगदी सुरुवातीच्या स्तरावरील कॅन्सरवर हे उपचार केले जातात कारण यामध्ये उच्च उर्जेने युक्त किरण हे विशिष्ट भागातील कॅन्सरच्या पेशींवर सोडले जातात.

अत्याधुनिक पध्दती जसे स्टिरिओटॅक्टिक रेडिएशन (एसबीआरटी) आणि इमेज गायडन्स (आयजीआरटी) मुळे रेडिएशनची अचूकता खूपच वाढली आहे. यामुळे त्वचेला होणारा त्रास किंवा एडेमा सारखा त्रास कमी होतो कारण यामध्ये ट्युमरच्या जवळपासच्या चांगल्या पेशी टिकून राहतात.

तुमच्यासाठी कोणती पध्दती योग्य आहे ?

आजाराचा प्रकार, त्याचा स्तर आणि रुग्णाची एकंदरीत परिस्थिती यावर केमोथेरपीचे उपचार करावेत किंवा रेडिएशन करावे या विषयी चर्चा केली जाऊ शकते. कधीकधी सर्वोत्कृष्ट निष्कर्श हे दोन्ही उपचारांना एकत्र करुन मिळवता येतात. केमोथेरपीचा छोटा डोस दिल्याने रेडिओ सेन्सेटायझेशन निर्माण करु शकतात यामुळे रेडिएशन चा उपयोग करुन कॅन्सरच्या पेशींवर उपचार करणे सोपे जाते.

Chemotherapy vs Radiation Therapy: Understand the Right Cancer Treatment with Expert Advice
Daibetes Management: मधुमेहाचे व्यवस्थापन करताना हृदय सुध्दा ठेवा निरोगी, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेले प्रभावी उपाय

ऑन्कोलॉजिस्ट (डॉक्टर्स) हे हा निर्णय घेण्यास मदत करण्यात मोठी भुमिका अदा करतात. ते रुग्णाच्या अनोख्या गरजांनुसार उपचारांचा कार्यक्रम सेट करतात यामुळे प्रत्येक निर्णयाचा नीट विचार होतो. कॅन्सरवरील उपचारांमध्ये अत्याधुनिक उपचारांमुळे अधिक प्रमाणात आशा आणि निष्कर्श निर्माण होण्यास मदत होते. रुग्ण आणि त्याच्या परिजनांचा उपचारांवरील विश्वास वाढतो आणि रेडिएशन आणि केमोथेरपी चे कार्य ते समजून घेऊ शकतात. कारण या स्पष्टते मुळेच कमी त्रास होऊन लवकर बरे होण्याची प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते.

- डॉ. करण चंचलानी

कन्सल्टंट- रेडिएशन ऑन्कोलॉजी

मणिपाल हॉस्पिटल, बाणेर, पुणे

FAQs

१. केमोथेरपी म्हणजे नेमकं काय असतं आणि ती कशी काम करते? (What is chemotherapy and how does it work?)
केमोथेरपी ही औषधांद्वारे कॅन्सरच्या पेशींवर परिणाम करणारी पद्धत असून ती शरीरभर रक्ताद्वारे फिरून लपून बसलेल्या कॅन्सर पेशींवरही कार्य करते.

२. रेडिएशन थेरपी म्हणजे काय आणि ती कोणत्या प्रकारच्या कॅन्सरसाठी उपयुक्त असते? (What is radiation therapy and for which types of cancer is it used?)
रेडिएशन थेरपी ही उच्च उर्जेच्या किरणांद्वारे ट्युमरच्या विशिष्ट भागावर उपचार करणारी टार्गेटेड पद्धत आहे, जी ब्रेन, प्रोस्टेट्स व सुरुवातीच्या कॅन्सरसाठी उपयुक्त असते.

३. केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीचे दुष्परिणाम काय असतात? (What are the side effects of chemotherapy and radiation therapy?)
केमोथेरपीमुळे केस गळणे, थकवा, मळमळ आणि इन्फेक्शन होऊ शकते, तर रेडिएशन थेरपीमुळे त्वचा त्रास, सूज आणि थकवा होऊ शकतो, परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे परिणाम कमी करता येतात.

४. केमोथेरपी आणि रेडिएशन एकत्रितपणे वापरणे का फायदेशीर ठरते? (Why is combining chemotherapy and radiation sometimes beneficial?)
काही वेळा केमोथेरपीचा हलका डोस रेडिएशनची प्रभावीता वाढवतो, ज्यामुळे दोन्ही उपचार एकत्र वापरल्यास कॅन्सरवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com