Cigarettes Addiction : लोकांचं सिगारेटचं व्यसन सुटत का नाही?

सिगारेट सोडण इतकं अवघड का आहे
Cigarettes Addiction
Cigarettes Addiction esakal

Cigarettes Addiction : सिगारेट सोडण इतकं अवघड का आहे? सिगारेट ओढणारे त्यापासून दूर का राहू शकत नाहीत? शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या संशोधनातून प्रश्नाचं उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियातील एका अभ्यासानुसार 60 ते 75 टक्के लोक धूम्रपान सोडल्यानंतर 6 महिन्यांच्या आत परत व्यसन करू लागतात.धूम्रपान सोडण अशक्य आहे असं अजिबात नाही, पण ते सोडण कठीण का असतं आणि विज्ञान काय सांगते हा प्रश्न आहे.

तुम्हाला सिगारेटचं व्यसन का लागतं?

सिगारेटच्या व्यसनामागे विज्ञानाचा फंडा आहे. वास्तविक, जेव्हा एखादी व्यक्ती सिगारेट ओढते तेव्हा त्यातील तंबाखू जळते. तंबाखू जाळल्याने निकोटीन बाहेर पडते. हे निकोटीन सिगारेट ओढणाऱ्याच्या रक्ताद्वारे फुफ्फुसात पोहोचते. निकोटीन मेंदूपर्यंत पोहोचते आणि मेंदूमध्ये उपस्थित असलेल्या निकोटिनिक एसिटाइलकोलीन रिसेप्टरला सक्रिय करते.

Cigarettes Addiction
Tips For Android Users: Android फोन वापरत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर...

सक्रिय रिसेप्टर्स न्यूरोट्रांसमीटर डोपामाइन रिलीज करतात. त्याचा परिणाम मेंदूच्या एका विशिष्ट भागावर होतो. या डोपामाइनमुळे हळूहळू सिगारेटच व्यसन वाढते. हा देखील एक प्रकारचा हार्मोन आहे. सिगारेट ओढल्यानंतर जेव्हा शरीरात डोपामाइन रिलीज होते तेव्हा त्या व्यक्तीला एक वेगळाच आनंद जाणवतो. आनंदाची ही अनुभूतीच त्याला पुन्हा पुन्हा असं करायला सांगते. सिगारेटच्या माध्यमातून त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा तेच अनुभवायचं असतं. त्यामुळे हळूहळू त्याला सिगारेट ओढण्याचे व्यसन जडते.

.

Cigarettes Addiction
Health Tips: सकाळी उपाशी पोटी खा चमचाभर देशी तूप; मिळतील ‘हे’ चमत्कारी फायदे

व्यसन का सुटत नाही?

जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला व्यसन सोडायचं असतं तेव्हा सिगारेट मधून मिळणारी आनंदाची विशेष अनुभूती संपू लागते. परिणामी, तो आनंदाची भावना परत मिळवू इच्छितो. यामुळेच त्या व्यक्तीला व्यसन सोडता येत नाही.

Cigarettes Addiction
Travel Story : मे महिन्यात फिरायला जायचंय ? ही ठिकाणं आहेत उत्तम

जागतिक आरोग्य संघटना (WHO) म्हणते की जगभरातील मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या अनेक प्रमुख कारणांपैकी धूम्रपान हे एक प्रमुख कारण आहे. जगभरातील 14 टक्के मृत्यू हे धूम्रपान आणि त्याच्याशी संबंधित आजारामुळे होतात. मागील काही संशोधनांनी असे सुचवले आहे की सिगारेट ओढणे हा जगात एक ट्रेंड बनला आहे, ज्याची व्याप्ती वाढत आहे.

Cigarettes Addiction
Adventure Travel Tips : Cycle सोलो ट्रिप प्लॅन करताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

व्यसनापासून मुक्ती कशी मिळवायची?

हे दोन प्रकारे थांबवता येऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पहिले तर धैर्य दाखवून त्याच्यापासून दूर राहून आणि दुसरे म्हणजे शिस्तबद्ध राहून. मात्र, निकोटीन घेण्याची इच्छा कमी करण्यासाठी अनेक उपचार पद्धती आहेत. त्या उपचारांद्वारे, रुग्णाला निकोटीनची सवय बंद करता येते. जसे की पॅचेस, इनहेलर. याशिवाय अशी काही औषधे आहेत जी हे व्यसन कमी करण्याचे काम करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com