Tanmay Bhatt : कॉमेडियन तन्मय भट्टने कमी केले 110 किलो वजन, तुम्ही देखील करू शकता हा डाएट

आपल्या कॉमेडीने लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आणणारा कॉमेडियन तन्मय भट्ट
Tanmay Bhatt
Tanmay Bhatt esakal

Tanmay Bhatt : स्टँड-अप कॉमेडियन तन्मय भट्टला कोण ओळखत नाही. आपल्या कॉमेडीने लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आणणाऱ्या तन्मयने काही महिन्यांपूर्वी ११० किलो वजन कमी करून सर्वांना थक्क केले. तत्पूर्वी वाढलेल्या वजनामुळे त्याला खूप टोमणे ऐकावे लागले होते. तर, स्टँड-अप कॉमेडियनने आपले वजन कसे कमी केले ते पाहूया.

Tanmay Bhatt
Safety Tips For Adventure Trip : न्यू इयरसाठी अ‍ॅडव्हेंचर ट्रिपवर निघालात? फॉलो करा या टिप्स

बॉडी-शेमिंगचा बळी ठरलेल्या तन्मय भट या स्टँड-अप कॉमेडियनने केटो डाएट फॉलो करून १९ महिन्यात तब्बल ११० किलो वजन कमी केले होते. म्हणजेच कॅलरीज कंट्रोल  करून तो आपले वजन नियंत्रित करू शकला. ३५ वर्षीय तन्मयने आपल्या आहारातून दर आठवड्याला २०० कॅलरीज कमी केल्या. यासोबतच त्याने शारीरिक हालचालीही वाढवल्या होत्या.

Tanmay Bhatt
Metkut Recipe : बारा महीने ज्याच्यासोबत मेतकूट जमतं अशा मेतकूट भाताची रेसिपी

रिपोर्ट्सनुसार,  6 फूट 3 इंच ऊंची असलेल्या तन्मयने रोज आपल्या कॅलरी सेवनाकडे विशेष लक्ष दिले. डायटच्या काळात तो दररोज 180-220 ग्रॅम प्रोटीन घेत असे. त्यामुळे स्नायूंची वाढ होण्यास मदत झाली. याशिवाय त्यांनी व्यायामावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. वजन उचलून त्याने वजन कमी केले. डेड लिफ्ट, स्कॉट, बेंच प्रेस आणि ओव्हरहेड प्रेस यासारखे व्यायाम दररोज केले जात होते.

Tanmay Bhatt
Bank Holidays In 2023: महत्वाची कामे पुढल्या वर्षावर ढकलू नका; जानेवारीत एवढे दिवस बँक असणार बंद

केटो डायट म्हणजे काय

आजकाल केटो आहाराचा ट्रेंड खूप वाढला आहे. या आहारात कर्बोदकांचे सेवन पूर्णपणे कमी केले जाते. चरबी आणि प्रथिने असलेले पदार्थ खाल्ले जातात. अतिरिक्त चरबीमुळे, कर्बोदकांमधे ऊर्जा घेण्याऐवजी, शरीर चरबीपासून ऊर्जा घेण्यास सुरुवात करते. केटो डाएटमध्ये फॅट खाल्ल्याने केटोन्स तयार होतात. जे ऊर्जेच्या रूपात शरीरातील चरबी जाळण्यास मदत करतात.  मात्र, हा आहार प्रशिक्षकाच्या देखरेखीखालीच पाळावा.

Tanmay Bhatt
Dal Methi Recipe : हेल्दी अन् टेस्टी डाळ मेथी खा अन् कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवा

केटो आहार कसा असावा ?

या डायट मध्ये तुम्ही ब्रोकोली, अंडी, एवोकॅडो, पूर्ण चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ, फ्लेक्ससीड आणि चिया सीड्स, फॅट-समृद्ध मासे जसे की ट्युना, मॅकेरल, सॅल्मन, स्टार्च नसलेल्या भाज्या फळे जसे की पालक, ओवा, जांभूळ आहारात घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com