Nagpur Corona Update : महिनाभारात कोरोनाचे 4 बळी; कोरोना विषाणूमुळे अजूनही लोकांचे हाल

कोरोनाची तीव्रता कमी झाली असली तरी, प्रादुर्भावाला पूर्णपणे आळा घातला जाऊ शकला नाही. महिनाभरात मेडिकलमध्ये 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Nagpur Corona Update
Nagpur Corona UpdateSakal

नागपूर : कोरोनाची तीव्रता कमी झाली असली तरी, प्रादुर्भावाला पूर्णपणे आळा घातला जाऊ शकला नाही. महिनाभरात मेडिकलमध्ये 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात वैद्यकीय प्रशासनाकडून वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला नियमितपणे अहवाल पाठविला जात आहे.

कोरोना विषाणूमुळे अजूनही लोकांचे हाल होत आहेत. सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रुग्णांमध्ये या आजाराची तीव्रता अधिक दिसून येत आहे. अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याचे मेडिकलच्या तपासात पुढे येत आहे. रुग्ण दाखल झाल्यानंतर संशयावरून नमुने तपासणीनंतर अहवाल पॉझिटिव्ह येत आहे.

अशा रुग्णांना कोविड वॉर्डमध्ये हलविले जाते. त्यापैकीच विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती यापूर्वीच समोर आली आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधून कोविडचे नियमित अहवाल पाठवले जात असले तरी स्थानिक प्रशासनाकडून मृत्यूची आकडेवारी जाहीर केली जात नाही. हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे संसर्गजन्य रोगांसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com