Diabetes Tips: आता डायबिटीज रुग्णही खाऊ शकतात गोड; फक्त या गोष्टींची घ्या काळजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diabetes Tips

Diabetes Tips: आता डायबिटीज रुग्णही खाऊ शकतात गोड; फक्त या गोष्टींची घ्या काळजी

डायबिटीज रूग्ण म्हटलं की अनेकांना गोड खाण्यास सक्त मनाई असते. मात्र आता या रूग्णांसाठी एक गोड बातमी आहे. होय तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती डायबिटीजचे रूग्ण असतील तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयोगाची आहे.

सिताफळ हे फळ अनेकांच्या आवडीचं फळ आहे. मात्र डायबिटीज पेशंटने हे फळ गोड असल्यामुळे खावं की नाही असं त्यांना वाटत असेल. मात्र सिताफळाचा वापर आयुर्वेदामध्ये दीर्घकाळापासून केला जातोय. सिताफळाचं संपूर्ण झाडचं खरं तर गुणकारी आहे. अनेक प्रकारच्या औषधांमध्येही सिताफळाचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया सिताफळ डायबिटीज रूग्णांनी खावे की नाही.

सिताफळ एनर्जीचा सगळ्यात चांगला सोर्स

नॉर्मल सफरचंदच्या तुलनेत सिताफळमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सिताफळ खाल्ल्याने जास्त एनर्जी मिळते. यात पोटॅशिअमची मात्रा जास्त असते. ज्यामुळे मसल्समध्ये येणारी कमजोरी आणि ब्लड सर्क्युलेशनसाठी हे फळ फायदेकारी ठरतं.

हेही वाचा: Health : मधुमेहींनी यंदा नवरात्रीला उपवास करताना घ्‍यावयाची काळजी

हार्ट हेल्थसाठी फायदेकारी - सिताफळ हे सोडियम आणि पोटॅशिअम मध्ये एक बॅलेंस रेषो असतो. यामुळे शरीरातील ब्लड प्रेशर कमी जास्त होत असल्यास ते कंट्रोलमध्ये होण्यास मदत होते. एका लहान सिताफळामध्ये १० पट मॅग्नेशिअम असतं. एखाद्या व्यक्तीसाठी एवढं प्रमाण पुरेसं असतं. एवढ्या प्रमाणातील मॅग्नेशिअम शरीरातील विविध अंगांना चालना देते. सोबतच मॅग्नेशियम हार्ट आणि मासपेशींना आरामही देतं. तसंच स्ट्रोकचा धोकाही यामुळे कमी होतो.

हेही वाचा: Diabetes असताना रात्रीचा रक्तदाब वाढतोय? जीवाचा धोका आत्ताच ओळखा

सिताफळ हे ड्रॅगन फ्रुटच्या तुलनेत जास्त गोड असतं. सिताफळाचं अतिसेवन रूग्णांसाठी हानिकारक ठरू शकतं, मात्र योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे अनेक फायदेही होऊ शकतात. योग्य प्रमाणात सिताफळ खाल्ल्यास सिताफळ फायदेकारी ठरू शकतं. सिताफळ हे लपॉलीफेनोलिक अँटीऑक्सिडंटने भरपूर असतं. डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी इंसुलिनचा वापर होतो. सिताफळ इंसुलिनचं अति उत्पादन आणि अतिप्रमाणातील ग्लुकोज अॅब्झॉर्ब करून शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवते.

हेही वाचा: Diabetes Diet Tips: गव्हाची पोळी खाल्ल्यानेही वाढू शकतो मधुमेह; जाणून घ्या कोणत्या पिठाची भाकरी असते फायदेशीर

डाएट एक्सपर्ट सांगतात की, सिताफळाचे छोटे भाग करून खावेत किंवा सिताफळ दलिया, दही यासोबतही खाता येतं.

डिप्रेशन आल्यासही फायदेकारी - सिताफळमध्ये अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील फ्री रॅडिकल्सच्या प्रभावापासून तुमचा बचाव होतो. तसेच स्ट्रेस कमी करण्यास आणि कँसर तसेच कोरोनरी हार्ट डिसीजच्या रोगांपासूनही तुमचा बचाव करते.

Web Title: Custard Apple Benefits For Diabetes Patients They Can Eat Custard Apple In Limit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..