Diabetes Control Tips : मधुमेह, उच्च रक्तदाब इतर आजारांसाठी घातक

Diabetes High Blood Pressure : तिशीनंतर आजार जडण्यास सुरुवात
Dangerous diseases for health diabetes high blood pressure jalna
Dangerous diseases for health diabetes high blood pressure jalnasakal

Diabetes High Blood Pressure : मागील काही दशकापासून प्रत्येक व्यक्तीच्या जीवन शैलीत बदल झाले आहेत. त्यामुळे एका विशिष्ट वयानंतर अनेकांना जगण्यासाठी गोळ्या-औषधांचा आधार घ्यावा लागत आहे. यात प्रामुख्याने मधुमेह आणि उच्च रक्तदाब आजाराला तर कोणीही गांभीर्याने घेण्यास तयार नाही.

मात्र, या दोन आजारांमुळे मानसाचे शरीर हे इतर आजारांचे माहेरघर बनत जाते. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर आरोग्याची काळजी घेऊन मधुमेह आणि उच्च रक्तदाब दूर ठेवला तरच पुढील आयुष्य ठणठणीत निरोगी जगता येणार आहे.

पूर्वी वयोवृद्ध व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाबाचा आजार जडत होता. त्यामुळे वयाची साठी पार केल्यानंतर अनेकांना या आजारांच्या गोळ्या खाण्याची वेळ येत होती. मात्र, हल्लीच्या बदलत्या जीवन शैलीमुळे वयाच्या ३० वर्षानंतर ८.८ टक्के नागरिकांना मधुमेह आणि २५ टक्के नागिरकांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला आहे.

याच प्रमुख कारण म्हणजे वयाच्या ३० वर्षानंतर वजन वाढायला सुरवात होते. मात्र, याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. त्यात बैठे काम असणाऱ्यांचा आहार वाढतो. परंतु, शारीरिक मेहनत होत नाही. त्यामुळे लठ्ठपणा आला की त्याच्यासोबत उच्च रक्तदाब आजार जडतो. उच्च रक्तदाब पाठोपाठ मधुमेहाचाही त्रास सुरू होतो.

Dangerous diseases for health diabetes high blood pressure jalna
High Blood Pressure in women : उच्च रक्‍तदाब ठरतोय महिलांचा शत्रू

त्यामुळे मधुमेहासह उच्च रक्तदाब आणि रक्त पातळ होण्याच्या गोळ्या खाण्याची वेळ वयाच्या तिशीनंतर अनेकांवर येत असल्याचे चित्र आहे. मात्र हे सर्व काही टळू शकते. त्यासाठी संतुलीत आजार, नियमित व्यायाम आणि वजन वाढीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असा सल्ला तज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे.

मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी हे टाळावे

ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आहे, त्यांनी जेवणात चवीसाठी तेलाचे आणि मिठाचे प्रमाण जास्त ठेवू नये. एकाच जागी बसून राहू नये. साखर, तूप, लोणी आदी बाबी टाळल्यास मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहून त्यात वाढ होत नाही. तसेच विविध प्रकारचे व्यसने करणे ही टाळावे. शिवाय इतर गोळ व तेलकट पदार्थांचा मोह टाळावा.

हे केल्यास होईल फायदा

मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी किंवा हा आजार जडूच नये, यासाठी वजन कमी करण्यासह प्रत्येक दिवसाला जास्तीत जास्त पाच ग्रॅम मिठाचे जेवणातून सेवन करावे. शारीरिक हालचाल करत व्यायाम, योगासने करणे गरजेचे आहे.

Dangerous diseases for health diabetes high blood pressure jalna
Blood Pressure: वाढलेला रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी काय कराल ?

आहारात पाल्याभाज्या, ऋतुनिहाय फळांचे सेवन, विविध डाळी, ज्वारी, गहू, बाजरीची भाकर, दूध घ्यावे. मांसाहारी असलेल्यांनी अंड्याचा पांढरा भाग, चिकन, मासे आणि काही प्रमाणात मटन आहारात घ्यावे. मात्र, मटणाचा आहारात जास्त वापर करू नये, असा सल्ला डॉक्टर देतात.

मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार वयाच्या तिशीनंतर जडण्यास सुरवात होते. वयाच्या ३० वर्षानंतर सुमारे ८.८ टक्के नागरिकांना मधुमेह व याच वयातील २५ टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा आजार जडतो.

त्यामुळे हे आजार टाळ्यासाठी शरीराची हालचाल करून दररोज नियमित व्यायाम करून वजन न वाढू देणे, रोजच्या खाण्यात सकस आहार घेणे आणि व्यसने करणे टाळणे, हाच उपाय आहे.

— डॉ. गजानन म्हस्के, सहायक आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com