
डोळ्यांखाली Dark circles येणं हा गंभीर आजार असू शकतो; जाणून घ्या सविस्तर
जगभरात अधिकतर लोकांना मधूमेहाचा(डायबिटीज)त्रास आहे. मधूमेहामध्ये शरीरातील ब्लड शुगर वाढू लागते. हे शरीरासाठी अत्यंत धोकादायक असते. जेव्हा ब्लड शुगर वाढते तेव्हा त्याची लक्षणे त्वचेवरही दिसतात, जसे की डार्क सर्कल, त्वचा सैल होणे किंवा डोळ्यांना सूज येणे. या सर्व गोष्टी तुमच्या शरीरात ब्लड शुगर जास्त असल्याचे लक्षण आहे.
हेही वाचा: Belly Fat कमी करायचं आहे? सकाळच्या नाश्त्यात ट्राय करा 'हे' तीन पदार्थ
मधुमेहाचे सर्वात सामान्य लक्षणे -
1. त्वचा कोरडी पडणे - हे मधुमेहाच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. शरीरातील शुगर काढून टाकण्यासाठी लघवी तयार होते. शरीरातील साखर बाहेर काढण्यासाठी पाण्याची गरज असते आणि पुरेसे पाणी न मिळाल्याने डिहायड्रेशनची समस्या सुरू होते. त्यामुळे त्वचेत सैलपणा येतो आणि डोळ्यांवर सूज येऊ लागते. मधुमेहामुळे ग्लाइकेशन प्रक्रियेचे मंदावते त्यामुळे त्वचेचा ताण कमी होऊ लागतो आणि डोळ्याभोवती डार्क सर्कल दिसू लागतात.
हेही वाचा: वातावरणात बदल; सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले, ट्राय करा हे घरगुती उपाय
मानेभोवतीची त्वचा काळी पडणे - जर तुमच्या मानेभोवतीच्या त्वचेचा रंग गडद होऊ लागला असेल तर याचा अर्थ तुमच्या रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढली आहे. यालाच वैदकीय भाषेत अकन्थोसिस निगरिकन्स म्हणतात. हे देखील डायबिटीजचे लक्षण असू शकते.
फोड येणे- डायबिटीजच्या रुग्णांना त्वचेवर फोड येण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागू शकते. या आजारात शरीराच्या कोणत्याही भागात फोड येऊ लागतात.हे फोड खूप खूप वेदनादायक असतात.
स्किन इन्फेक्शन- डायबिटीजच्या रुग्णांना स्किन इन्फेक्शनच्या समस्येलाही सामोरे जावे लागू शकते. डायबिटीजमुळे होणारा हा त्वचेचा संसर्ग शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो.
त्वचा कडक होणे- डायबिटीजमुळे तुमच्या शरीराच्या काही भागांची त्वचा खूप कडक होते,त्यामुळे हालचाल करताना खूप त्रास होतो.
Web Title: Dark Circle Is Very Dangerous Symptoms Check Here Its Causes
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..