
वातावरणात बदल; सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले, ट्राय करा हे घरगुती उपाय
गेल्या काही दिवसापासून 'असनी' चक्रीवादळाने सर्वत्र धुमाकूळ घातलाय. या चक्रीवादळामुळे वातावरणात बदल दिसून येत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात उष्णतेचा पारा घसरला असून हवेत गारवा जाणवू लागला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला आणि तापाचे सर्वाधिक रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे व्यायामासह योग्य आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. (cold cough patients increase due to climate change, check here home remedies)
हेही वाचा: 'असानी'चक्रीवादळामुळे पुणेकरांचा उन्हाळा सुसह्य
या वातावरण बदलामुळे साथीचे रोग, तसेच सर्दी, खोकला, तापाचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला झाल्यास आपण डॉक्टरकडे जाणे टाळतो मात्र हे चुकीचे आहे. जर तुम्हाला सर्दी खोकला झाल्यावर डॉक्टरकडे जाणे कंटाळवाणे वाटत असेल तर पर्याय म्हणून सर्दी खोकलावर खालील घरगूती उपाय ट्राय करा.
हेही वाचा: हार्ट अटॅकचा धोका कमी करतात 'या' फायबर युक्त गोष्टी!
१. आल्यासोबत लिंबू आणि मधाचे सेवन केले गेले तर सर्दी-खोकलापासून त्वरीत आराम मिळतो.
२. दालचिनी सर्दी-खोकला बरं करण्यासाठी रामबाण उपाय आहे. हे व्हायरल आणि इतर संक्रमण बरे करण्यात मदत करते
३. रात्री एका भांड्यात कांद्याचे काही तुकडे आणि मध मिसळा. रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी खा.
४. वातावरण बदलामुळे जर नाक बंद पडले तर तुळशीचा वापर करुन नाकपुडी उघडण्यास मदत होते.
५. सर्दीपासून आराम मिळवायचा असेल सकाळी आणि रात्री हळदीचे दुध प्या
हेही वाचा: Belly Fat कमी करायचं आहे? सकाळच्या नाश्त्यात ट्राय करा 'हे' तीन पदार्थ
बंगालच्या उपसागरात ‘असनी’ चक्रीवादळ शमताच कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने मान्सूनची वाट सुकर झाली आहे. यामुळे दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागरात १५ मे रोजीच म्हणजेच ५ दिवस आधीच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. . तर राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, दिल्ली, महाराष्ट्रात वातावरण बदलात चढउतार दिसून येणार.
Web Title: Cold Cough Patients Increase Due To Climate Change Check Here Home Remedies
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..