How to reduce belly fat in Marathi | Belly Fat कमी करायचं आहे? सकाळच्या नाश्त्यात ट्राय करा 'हे' तीन पदार्थ | Healthy Lifestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

How to lose belly fat naturally, How to reduce belly fat in Marathi

Belly Fat कमी करायचं आहे? सकाळच्या नाश्त्यात ट्राय करा 'हे' तीन पदार्थ

प्रत्येकाला प्रश्न पडतो की सकाळच्या नाश्त्यात काय खावं? सकाळच्या नाश्त्यात तुम्ही जितकं जास्त पौष्टिक पदार्थ खाल तितकी जास्त एनर्जी शरीराला मिळते. खरं तर मेटाबोलिझम वाढवायचं असेल किंवा वजन नियंत्रित ठेवायचं असेल, तर सकाळच्या नाश्ता हा हेल्दी असावा. (How to reduce belly fat in Marathi)

आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यातील असे तीन पदार्थ सांगणार आहोत. जे तुमचं मेटाबोलिझम वाढवणारच पण सोबत तुमचं वजन कमी करण्यासही मदत करणार.

हेही वाचा: उन्हाळ्यात चेहरा टॅन होतोय? कैरीचं घरगुती फेसपॅक वापरा

१. रव्याचा उपमा

रवा हा पचनास खूप हलका असतो. त्यामुळे रव्याचं तिखट उपम्याचं सेवन शरीरासाठी उत्तम असतं. रव्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. यामुळे सारखं सारखं काही खाण्याची इच्छा होत नाही. म्हणजेच आपण अतिरिक्त कॅलरीज घेण्यापासून वाचतो. त्यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहतं

हेही वाचा: उन्हाळ्यात किती ग्लास पाणी प्यावं? जाणून घ्या

शिजवलेले किंवा भाजलेले चणे

उकळवून मीठ-मसाल्यात भाजलेले किंवा शिजवलेले चणे खाल्ल्याने शरीराला प्रोटिन मिळतं. सकाळच्या नाश्त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चणे भिजत घाला. सकाळी कुकरमध्येचणे शिजवून घ्या. त्यातील पाणी गाळून चण्यांना धणे पावडर, जिरे, कांदा, लसूण, टोमॅटो व कोथिंबीर घालून तडका द्या.हा नाश्ता शरीराला अत्यंत पौष्टीक असतो वजन नियंत्रणात ठेवतो.

हेही वाचा: Metabolism वाढवायचा आहे? सकाळी उपाशी पोटी खा हे पदार्थ

गोड-तिखट डाळ खिचडी

डाळ खिचडी वेगवेगळ्या प्रकारे खाल्ली जाऊ शकते. तुम्ही त्यात दूध-साखर टाकून गोड खिचडी पण खाऊ शकतात तर मसाल्यांचा तडका देऊन नमकिन फ्लेवरमध्येही तुम्ही खिचडी बनवून खाऊ शकता. खिचडीमध्ये फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. अॅंटीऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण असलेली खिचडी मेटाबोलिझम वाढवण्यासोबतच वजन नियंत्रित ठेवते.

Web Title: Check Healthy Breakfast List Which Help You For Fat Loss

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top