Day Sleeping : दिवसा झोपणे शरीरासाठी फायद्याचं की तोट्याचं? जाणून घ्या एका क्लिकवर l day sleeping is good or bad for body know day sleeping benefits | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Day Sleeping

Day Sleeping : दिवसा झोपणे शरीरासाठी फायद्याचं की तोट्याचं? जाणून घ्या एका क्लिकवर

Day Sleeping : चांगल्या झोपेचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध असतो. लठ्ठपणा, तणाव, हृदयाशी संबंधित समस्यांपासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञ ७ ते ८ तास झोपेचा सल्ला देतात. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की दिवसा झोपणे योग्य की अयोग्य? याबाबत अनेक संशोधनेही झाली आहेत. त्यापैकी एका संशोधनानुसार, दुपारी लाँग स्नॅप घेण्याऐवजी 10 मिनिटांची डुलकी आरोग्यासाठी प्रत्येक प्रकारे फायदेशीर आहे. दिवसातून 10-15 मिनिटे झोपण्याचे अनेक फायदे आहेत.

दिवसा झोपण्याचे फायदे

दिवसातून 10 मिनिटे झोप घेतल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटते.

- स्मरणशक्ती वाढते.

- थकवा नाहीसा होतो.

शरीरात ऊर्जा राहते.

- विचार करण्याची, समजून घेण्याची आणि शिकण्याची क्षमता वाढते.

- रक्तदाब सामान्य राहतो.

जर तुम्हाला दिवसभर थकवा आणि सुस्ती वाटत असेल तर ती दूर करण्यासाठी १० मिनिटे झोप घेण्यास काहीच हरकत नाही.

दिवसभरात किती झोपावे

दिवसभरात जास्त झोपणे आरोग्यासाठी चांगले नाही हे लक्षात ठेवा. जर तुम्ही बराच वेळ झोपलात तर तुम्हाला सुस्ती वाटते. काहीही करावेसे वाटत नाही आणि रात्री नीट झोपही येत नाही. त्यामुळे शरीराला रिचार्ज करण्यासाठी फक्त 10 मिनिटांची डुलकी पुरेशी आहे.

दिवसा कधी झोपायचे

दुपारच्या जेवणानंतर एक किंवा दोन तास, दोन ते तीन वाजेपर्यंत झोप घेण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. यावेळी शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते.

दिवसा झोपेवर मात करण्यासाठी चहा किंवा कॉफीचे जास्त सेवन करणे चुकीचे आहे. अर्थात, चहा आणि कॉफीमुळे तुम्हाला काही काळ बरे वाटू शकते, परंतु काही काळानंतर तुम्हाला पुन्हा सुस्ती आणि थकवा जाणवू शकतो. (Sleep) त्याऐवजी, 10-15 मिनिटे झोपून तुम्ही खूप उत्साही राहू शकता.