Daytime Sleep: रात्री जागताय अन् दिवसा झोपताय! लवकरच व्हा सावध; डॉक्टर काय सांगतात?

Daytime Sleep Can Raise Dementia Risk: रात्रीची झोप पूर्ण करण्यासाठी दिवसा झोपतात. पण, दिवसा झोपणे तुमच्यासाठी हानीकारक ठरु शकते.
Sleep
Sleep

Daytime Sleep- अनेकजण रात्री उशिरापर्यंत जागतात. तसेच रात्रीची झोप पूर्ण करण्यासाठी दिवसा झोपतात. पण, दिवसा झोपणे तुमच्यासाठी हानीकारक ठरु शकते. हैद्राबादमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी याची माहिती दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. डॉ. सुधीर हे इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजिस्ट आहेत.

दिवसाची झोप ही तुमच्या शरीराच्या घड्याळाची संलग्न झालेली नसते. त्यामुळे दिवसा झोप घेतल्याने स्मृतिभ्रंश आणि मानसिक विकाराच्या समस्या निर्माण होऊ शकतात. दिवसाची झोप वेगळ्या श्रेणीमध्ये मोडते. ती तुमच्या शरीराच्या घड्याळाची संलग्न झालेली नसते. त्यामुळे सकाळची झोप इच्छित फळ साध्य करु शकत नाही, असं डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Sleep
Sleep Disorders and Problems : पूर्ण झोप होत नाही, दिवसा झोप येते?

रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या काही लोकांवर अभ्यास करण्यात आला होता. यात आढळून आलं की रात्री जागरण करुन काम करणाऱ्या लोकांमध्ये ताण, लठ्ठपणा, आकलनक्षमतेत कमी, न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजार ( मेंदुसंबंधी) समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो, असं डॉक्टर कुमार म्हणाले.

मेंदुतील प्रोटिन वेस्ट प्रोडक्ट नष्ट करण्याचं काम ग्लिम्फॅटिक सिस्टिम करत असते. झोपेच्या दरम्यान ही सिस्टिम सक्रिय असते. झोप होत नाही त्यावेळी ही ग्लिम्फॅटिक सिस्टिम अपयशी ठरते. त्यामुळे स्मृतिभ्रंशचा धोका वाढतो. ग्लिम्फॅटिक सिस्टिमच्या निष्क्रियतेमुळे मेंदुमध्ये अधिक प्रमाणात प्रोटिन वेस्ट प्रोडक्ट जमा व्हायला लागतात. त्यामुळे मेंदूसंबंधातील आजारांना निमंत्रण मिळते.

Sleep
Randeep Surjewala : सुरजेवालांवर ४८ तासांची प्रचारबंदी, लोकसभा निवडणुकीतील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई..

चांगली झोप घेणारे लोक जास्त जगतात. चांगल्या झोपेमुळे मानसिक स्थिती चांगली राहण्यास मदत होते. त्यामुळे आनंदी जीवनमान व्यक्ती जगू शकतो. पण, कमी झोपेमुळे वजन वाढणे, तणाव, श्वसनासंबंधी आजार, अलझायमर अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. नियमितपणे रात्रीची झोप टळत असल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असं डॉक्टर म्हणतात. (Health News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com