Warm Water : रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? डायटिशियनकडून जाणून घेऊया

सकाळी रिकाम्या पोटी हेल्दी ड्रिंक किंवा डिटॉक्स ड्रिंक घेणे किंवा कोमट पाणी पिणे या उपायांचा अवलंब लोक वजन कमी करण्यासाठी करतात
Warn Water
Warn Wateresakal

Is Warm Water Helps To Reduce Weight : असंतुलित आहार आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या झपाट्याने वाढत आहे. वजन वाढल्याने शरीरात अनेक समस्याही वाढतात. वजन कमी करण्यासाठी बरेच लोक सर्व प्रकारचा डाएट, व्यायाम इत्यादींचा अवलंब करतात. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक घरगुती उपाय देखील करतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी हेल्दी ड्रिंक किंवा डिटॉक्स ड्रिंक घेणे किंवा कोमट पाणी पिणे या उपायांचा अवलंब लोक वजन कमी करण्यासाठी करतात. पण खरंच सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया डायटिशियनकडून.

सकाळची सुरुवात कोमट किंवा गरम पाण्याने करणे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. नियमित गरम पाणी प्यायल्याने तुम्हाला अनेक गंभीर आजारांशी लढण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक रिकाम्या पोटी गरम पाण्याचे सेवन करतात. असे म्हटले जाते की रोज रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

Warn Water
Warm Water Benefit: गरम पाण्यात दडलंय ग्लोइंग त्वचेचं रहस्य; जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट

आरोग्य हेल्थ सेंटरचे क्लिनिकल डायटिशियन डॉ. वी डी त्रिपाठी सांगतात की, सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. पण गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होते असे म्हणणे चुकीचे ठरेल. गरम पाणी फक्त तुमच्या शरीरातील चयापचय सुधारण्यास मदत करते. यामुळे शरीरातील चरबी वितळण्याच्या प्रक्रियेला गती मिळू शकते." गरम पाण्याने वजन कमी होत नाही आणि गरम पाण्याचे जास्त सेवन केल्याने बरेच नुकसान देखील होऊ शकते.

Warn Water
Weight Loss Tips चुकीच्या पद्धतीने शरीराचे वजन कमी केल्यास होऊ शकतात हे दुष्परिणाम

गरम पाणी वजन कमी करण्यास कसे फायदेशीर ठरते?

दररोज सकाळी गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. याशिवाय, याचे नियमित सेवन करणे चयापचय सुधारण्यासाठी देखील फायदेशीर आहे. चयापचय ही शरीरात होणारी एक प्रक्रिया आहे, ज्यामुळे चरबी जलद वितळण्यास सुरुवात होते. मात्र अनियमित आहार आणि निष्क्रिय जीवनशैलीमुळे शरीरातील चयापचय क्रिया मंदावते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com