रोज रात्री जेवण करणे टाळताय? आरोग्यावर काय होतो परिणाम? जाणून घ्या

रोज रात्री जेवण करणे टाळताय? आरोग्यावर काय होतो परिणाम? जाणून घ्या

Dinner Benefits: वाढत्या वजनमुळे कित्येकांसाठी मोठी समस्या आहे. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी काही लोक काय काय नाही करत. योगा, एक्सरसाईज पासून जेवण कमी करण्यापर्यंत सर्व उपाय सुरु करतात. आजकाल काही लोक वजन कमी करण्यासाठी एकवेळचे जेवण टाळतात. सध्या हा टेंड सुरु आहे. ज्यामुळे कित्येक लोक रात्रीचे जेवण (Dinner) खात नाही पण तुम्हाला माहिती आहे का रात्री जेवण न केल्यास तुमच्या आरोग्यावर (Side Effects) काय फरक पडतो?

जर तुम्हाला डायटिंग करत असाल तर तुम्हाला कॅलरी फ्री आणि हलका आहार करायला हवा पण रात्री जेवण स्किप करू नये कारण तुम्हाला थकवा येऊ शकतो. विशेषता सतत काही दिवस रात्रीचे जेवण स्किप केल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. रात्री जेवण न केल्यास आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत जाणून घेऊ या...

रोज रात्री जेवण करणे टाळताय? आरोग्यावर काय होतो परिणाम? जाणून घ्या
ऑडी इंडियाचा मोठा निर्णय, १ एप्रिलपासून कार महागणार

थकवा येऊ शकतो

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी उर्जा (Energy) असणे गरजेचे आहे. एक्सपर्टच्या मतानुसार, रात्रीचे जेवण आणि सकाळचा ब्रेकफास्टमध्ये कित्येक तासांचा फरक असतो. त्यामुळे रात्रीचे जेवण जेवण्यासाठी शरीरामध्ये उर्जा कमी होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला थकवा आल्यासराखे वाटू शकते. तसेच बॉडीला पुरेशा प्रमाणात Nutrients न मिळाल्यास अशक्तपणा येऊ शकतो.

रोज रात्री जेवण करणे टाळताय? आरोग्यावर काय होतो परिणाम? जाणून घ्या
Earphone सतत वापरताय! कानावर होतात असे परिणाम

झोप पूर्ण होत नाही

एक्सपर्टनुसार, वजन कमी करण्यासाठी हलका आहार तुम्ही रात्रीच्या जेवणाच्यावेळी घेणे जितके फायदेशीर ठरू शकते तितके रात्रीचे जेवण टाळणे नुकासानदायक ठरू शकतो. त्यामुळे हळू हळू तुमची भूक कमी होते. झोपताना रिकामा पोट राहिल्यास गॅसचा त्रास होऊ शकतो. ज्यामुळे तुमचे झोप पूर्ण होत नाही आणि आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

रोज रात्री जेवण करणे टाळताय? आरोग्यावर काय होतो परिणाम? जाणून घ्या
पालकांनो, मुलांना झोपेची शिस्त लावा! वाचा अभ्यास काय सांगतो

शरीरामध्ये होईल न्युट्रीएंटसची कमतरता

वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये शरीरामध्ये भरपूर पोषण देणे गरजेचे असते. अशा वेळी जेवण न केल्यामुळे शरीरारला पुरेशा प्रमाणात पोषण मिळू शकत नाही. ज्यामुळे पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते आणि तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ शकतो.

याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर पडतोच त्याशिवाय, रक्ताची कमतरता अॅनिमिया, वीकनेस चक्कर येणे आणि लवकर आजारी पडण्याची शक्यता वाढते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com