पावसाळ्यात केस गळतात? तेल किंवा शँम्पू बदलण्याची गरज नाही, करा फक्त ‘ही’ पाच योगासने

आज आम्ही तुम्हाला अशी पाच योगासने सांगणार आहोत ज्यामुळे तुमची केस गळणे कमी करण्यास आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होतील.
tips for hair fall
tips for hair fallsakal

पावसाळ्यात केस गळणे ही खुप मोठी समस्या आहे. केस गळणे थांबविण्यासाठी आपण अनेकदा नानाविविध प्रकार ट्राय करतो, मग तेल बदलवणे किंवा शँम्पू बदलवणे असो किंवा वेगवेगळ्या औषधी घेणे.पण याचा काहीही फायदा होत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशी पाच योगासने सांगणार आहोत ज्यामुळे तुमची केस गळणे कमी करण्यास आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होतील.

tips for hair fall
Health: वात वाढवणारा आहार कोणता ? जेवणात टाळा ही पदार्थ

शिर्षासन

शिर्षासनामुळे टाळूमध्ये रक्त संचरण सुधारते ज्यामुळे केस गळणे कमी होते. सोबतच यामुळे केसांची वाढ सुधारण्यास मदत होते.

बालासन

बालासन हा पोटाशी संबंधित कोणत्याही आजारांसाठी रामबाण उपाय आहेय बालासन केल्याने पचनसंस्थेवर सकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे केस गळतीचे थांबते आणि केसाचे आरोग्य सुधारते.

tips for hair fall
Health Tips: व्हायरल फिव्हरमध्ये लगेच खाऊ नका औषध, लवकर बरे होण्यासाठी करा 'हे' उपाय

कपालभाती

कपालभाती हा प्राणायामाचा प्रकार असून यामुळे शरीरात स्वच्छ ऑक्सिजन वायू जाते.दररोज कपालभाती केल्याने केसांचे आरोग्य सुधारते. आणि केस गळती थांबते.

अधोमुखासन

सूर्य नमस्कारादरम्यानची एक पोझ म्हणून अधो मुखावानासनची ओळख आहे. यामुळे रक्त प्रवाह वाढतो आणि स्कॅल्पपर्यंत ऑक्सिजन पुरवठा वाढतो आणि केसांची वाढ होते.

सर्वांगासन

सर्वंगासन हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. यामुळे शरिराचे संतुलन स्थिरावते. यामुळे शरीरातील रक्त संचरण सुधारते आणि केस गळणं थांबतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com