Weight Loss : मधुमेहाच्या रूग्णांनी वजन कमी करण्यासाठी वापरा या 4 ट्रिक्स, हृदयावर ताण पडणार नाही

आज आपण खास मधुमेहाच्या रूग्णांसाठी वजन कमी करण्याच्या काही खास सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत
Weight Loss
Weight Lossesakal

Weight Loss : भारतात जवळपास ७७ मिलीयन लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. ज्यामुळे भारताला मधुमेहाची राजधानी म्हणूनही ओळखले जाते. मधुमेहाच्या रूग्णांमध्ये वजन वाढणे ही फार सामान्य समस्या आहे. मात्र वजन कमी करण्यासाठी योग्य पद्धत वापरली गेली नाही तर या रूग्णांना हार्ट अटॅक, मधुमेह, किडनी डॅमेज यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तेव्हा आज आपण खास मधुमेहाच्या रूग्णांसाठी वजन कमी करण्याच्या काही खास सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत.

मधुमेह हा एक जेनेटिक आजार असू शकतो किंवा जीवनशैलीतील काही गंभीर बदलांमुळेही हा आजार होऊ शकतो. हाय कॅलरी किंवा स्थूलतेमुळेही वजन वाढू शकते. तेव्हा हृदयावर ताण न पडता वजन कमी कसं करायचं त्याच्या चार सोप्या पद्धती जाणून घेऊयात.

Weight Loss
Diabetes Control Tips: डायबेटीज च्या रूग्णांनी फळं खावीत की नाही? डॉक्टरांचाच सल्ला ऐका!

रिफाइंड कार्बोहायड्रेट कमी कमी खा

रिफाइंड साखर, मिठाई, कोलो, ज्यूस कार्बोहायड्रेट्स घेणे टाळा. यामुळे तुमची ब्लड शुगर लेव्हल लगेच वाढू शकते. पांढरे तांदूळ, पिझ्झा, ब्रेकफास्ट, सीरीयल, पेस्ट्री आणि पास्ता यांसारख्या प्रोसेस्ड आणि रिफाइंड फूडचा वापर कमी करा.

हाय फायबर फूड

वजन कमी करण्यासाठी कडधान्ये, दाळ आणि फळं, पालेभाज्या, मेथीचे दाणे, हाय फायबर फूड यांसारख्या पदार्थांचा जेवणात समावेश करून घ्या. यामुळे तुमचे पोटही भरेल आणि तुम्हाला लवकर भूकही लागणार नाही. त्यामुळे तुमचे वजनही नियंत्रणात राहील. (Diabetes)

Weight Loss
Weight Loss : काही केल्या वजन कमी होत नाहीये ? म्हणजे बिघडलंय तुमचं मानसिक आरोग्य

बाहेरचे पदार्थ, जंक फूड कमी खा

बाजारातून पदार्थ विकत घेण्यापेक्षा घरी शिजवलेले जेवण जेवा. यामुळे तुमची फक्त शुगर लेव्हलच नाही तर हायड्रोजेनेटेड ऑइल सॅच्युरेशनही कमी होण्यात मदत होते. यामुळे हृदयरोगाचा धोकाही कमी होईल.

व्यायाम

फिजीकल अॅक्टिव्हिटी तुमचं वजन कमी करण्यास मदत करते. फिजीकल अॅक्टिव्हिटी शरीरात शुगर रनरचे काम करते. ज्यामुळे तुमच्या शरीरात इंसुलिन सुरळीत काम करते. आठवड्याभरा कमीत कमी 150 मिनिट व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.

डिस्क्लेमर - वरील लेख समान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com