Healthy Tips: चरबीयुक्त पदार्थ खात असाल तर बिघडू शकते हॉर्मोन्सचे संतुलन

Healthy Tips: बदललेल्या जीवनशैलीमुळे विविध वयोगटाच्या लोकांमध्ये शरीरातील हार्मोन्स असंतुलनाच्या तक्रारी वाढत आहे.
Healthy Tips:
Healthy Tips:Sakal

डॉ. राहुल राऊत, आर्युवेद तज्ज्ञ, नागपूर

Eating fatty foods can disrupt balance of hormones

तारुण्यात पदार्पण करतेवेळी, मासिक पाळी सुरू होताना, गरोदरपणात, नंतर मेनोपॉज, वृद्धपकाळ अशा टप्प्यांवर शरीरातील हॉर्मोन्सचे असंतुलन वाढत असल्याचे दिसून येते. परंतु अलीकडे विविध वयोगटाच्या लोकांमध्ये शरीरातील हार्मोन्स असंतुलनाच्या तक्रारी वाढत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. याला बदललेली जीवनशैली कारणीभूत आहे. यामुळेच हॉर्मोन्सवर परिणाम होतो आणि अनेक जुनाट रोग जडतात.

शरीरातील हार्मोन्सच्या बदलाने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. एन्डोक्राईन ग्लॅंड्समध्ये स्रवणारे रसायन म्हणजे हॉर्मोन्स. चयापचय क्रिया, वाढ, पुनर्निर्मिती, लैंगिक आरोग्य, मूड्स, त्वचा आणि केसांचे आरोग्य आणि अगदी झोपेसारख्या महत्त्वाच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यास या 50 पेक्षा जास्त ग्लँड्स म्हणजे ग्रंथी मदत करतात. शरीरातील हॉर्मोन्सचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त झाले तर हॉर्मोन्समध्ये असंतुलन असल्याचे समजले जाते.

  • हार्मोन्सचे असंतुलन वाढण्याची कारणे

ताण

जास्त काळ बैठे काम

एकाच जागी बसून राहणे

चरबीयुक्त पदार्थ खाणे

अपूर्ण झोप

असंतुलनाचे परिणाम

थायरॉईड

पीसीओडी

मधुमेह

वंध्यत्व

असंतुलनाची लक्षणे

अचानकपणे वजनात वाढ

अचानक वजन कमी होणे

थकवा जाणवणे

बधिरपणाचा भास होणे

हातापायांना मुंग्या येणे

कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त वाढणे

नैराश्य किंवा अस्वस्थपणा यांसारख्या मानसिक समस्या जाणवणे

याकडे लक्ष द्या

रिकाम्या पोटी कॉफी पिणे टाळा

जेवणाच्या ठराविक वेळा पाळा

ताण न बाळगता मन शांत ठेवावे

पुरेशी झोप घ्यावी

बैठे काम जास्तवेळ करू नका

Healthy Tips:
Summer Health: उन्हाळ्यात हृदयविकारासह वाढू शकतो 'या' आजारांचा धोका, अशी घ्या काळजी
  • प्लास्टिक, ॲल्युमिनिअम, नॉनस्टिक भांड्यांचा वापर करू नका

लाइफस्टाइलमधील अनेक गोष्टी हॉर्मोन्सवर परिणाम करतात. हॉर्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे. वेळीअवेळी जेवत असाल तर त्यामुळे तुमची आतडी गोंधळात पडते आणि पचनासाठीच्या हॉर्मोन्सवर याचा परिणाम होतो. पित्त, गॅस, पोट वाढणे, ब्लोटिंग, आतड्यांना चिरा जाणे, लाल रक्तपेशी आदी आजारांमागचे मुख्य कारण असते. त्यामुळे शक्यतो जेवणाच्या वेळा नक्की करा आणि त्या पाळण्याचा प्रयत्न करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com