Healthy Lifestyle: व्यायाम आणि विश्रांती जीवनमान-जीवनभान

Balance Exercise and Relaxation for a Better Quality of Life: रोज व्यायाम करता; पण पुरेशी विश्रांती घेता का? निरोगी आयुष्यासाठी जाणून घ्या महत्त्व
Exercise and Relaxation Benefits How a Balanced Routine Supports Physical Health Mental Peace and Better Living

Exercise and Relaxation Benefits How a Balanced Routine Supports Physical Health Mental Peace and Better Living

sakal

Updated on: 

डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (पीटी) प्राध्यापक आणि सल्लागार, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी

आजकाल लोक व्यायामाविषयी उत्सुक आहेत आणि आरोग्य राखण्यासाठी अधिक सजग झाले आहेत. हा नक्कीच स्वागतार्ह बदल आहे. रोज व्यायाम करणं, ठरावीक पावलं चालणं, वजन कमी करणं, जास्त कॅलरी खर्च करणं किंवा स्वतःचे फिटनेस रेकॉर्ड मोडणं याला महत्त्व दिलं जातं. मात्र, या धडपडीत एक प्रश्न मागे पडतो - आपण व्यायाम शरीरासाठी करतोय, की शरीराकडून सतत काहीतरी मिळवण्याची अपेक्षा करतोय? काही व्यक्तींमध्ये व्यायामाचं प्रमाण इतकं वाढलेलं दिसतं, की त्यांना व्यायामाचं व्यसन (Exercise Addiction) लागल्यासारखं वाटतं. रोजचं चालणं किंवा व्यायाम चुकल्यावर त्यांना अपराधी वाटतं. अशा वेळी व्यायामातील समतोल म्हणजे काय, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

Loading content, please wait...