Fish Health Tips : रोज मासे खाण्याचे भरमसाठ फायदे; या आजारावर आहे गुणकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fish Health Tips

Fish Health Tips : रोज मासे खाण्याचे भरमसाठ फायदे; या आजारावर आहे गुणकारी

Fish Health Tips : सुरमई, पापलेट, रावस , बांगडा, कोळंबी, चिंबोरी अशी नुसती नावे जरी ऐकली तरी मासेप्रेमींचे कान टवकारले जातात. रोजच्या जेवणात मासे मनापासून खाणारे करोडो लोक आहेत. जगभरात सीफूड लोकप्रीय आहे. पण, लोक केवळ आवड म्हणून मासे खातात पण त्याचे आपल्या आरोग्यासाठी भरमसाठ फायदे आहेत.

हेही वाचा: Health Tips: वजन कमी करण्यासाठी रोज ओट्स खाताय? आधी हे वाचा

ऑटोइम्युन डिसीजमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्तीच आपल्या शरीराचं प्रचंड नुकसान करते. साधारणतः शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बॅक्टेरिया आणि प्राणघातक विषाणूंविरोधात लढण्याची क्षमता आपल्याला प्रदान करते. पण या आजारामध्ये इम्युन सिस्टिमच महत्त्वाच्या अवयवांना हानी पोहोचवते. मागील वर्षी अभिनेत्री सुश्मिता सेनलाही हा आजार झाला होता. त्यावर तिने सोशल मिडीयावर पोस्ट करून चाहत्यांना माहिती दिली होती.

हेही वाचा: Winter Health Tips: हिवाळ्यात ऊन महत्वाचं पण सकाळचं ऊन कधी केव्हा अन् किती वेळ घ्यावं?

या आजारावर गुणकारी ठरतात. मासे स्वादिष्ट तसेच अनेक फायदेशीर पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. माशांच्या नियमित सेवनाने अनेक रोगांचा धोका कमी होतो. त्यामूळे आज मासे खाण्याचे आरोग्य फायदे जाणून घेऊया

हेही वाचा: Men's Health Tips: पुरुषांनी लोणचे का खाऊ नये? कारण वाचाल तर अवाक व्हाल...

जर्नल ऑफ इंटर्नल मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनानुसार, मासे आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड समृध्द अन्नपदार्थ खाल्ल्याने कर्करोग आणि हृदयविकार यांसारख्या आजारांमुळे मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो.

हेही वाचा: Health Tips: सकाळच्या 'या' चुका ठरताय तुमच्या लठ्ठपणाचे कारण

मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर

माणसांचे वय वाढेल तसे मेंदूचे काम कमकुवत होऊ लागते. त्यामुळे वय जास्त झाल्यावर मेंदूची काम करण्याची क्रिया मंदावते. या आजारावर मासे खाण्याचा सल्ला दिला जातो. माशांच्या नियमित सेवनाने मानसिक आरोग्य सुधारण्यास तसेच अनेक गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते. रोज मासे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.

हेही वाचा: Winter Health Tips : हिवाळ्यात व्हायरल इन्फेक्शनची भीती वाटते? खा फक्त ही एक गोष्ट

नैराश्यातून बाहेर काढतील मासे

नैराश्य ही एक मानसिक स्थिती असून ज्यात मूड बदलणे, शरीरातील शक्ती कमी होणे, सतत तणावाची स्थिती असणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. हृदयाशी संबंधित आजार आणि वजन वाढत असेल तर हे नैराश्याचे लक्षण आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जे लोक नियमितपणे मासे खातात त्यांच्यामध्ये नैराश्य खूप कमी आढळते. माशांमध्ये असलेले ओमेगा ३ फॅटी अॅसिड नैराश्यापासून मुक्त होण्यास मदत करते.

हेही वाचा: Pregnancy Health Tips : गर्भावस्थेत ग्रीन-टी घेतल्याने होते का वेळेआधी प्रसुती? जाणून घ्या तोटे

डोळ्यांसाठी फायदेशीर

ओमेगा -3 फॅटी ऍसिड दृष्टी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. संशोधनानुसार, ओमेगा-३ फॅटी अॅसिडच्या सेवनाने मेंदू आणि डोळ्यांना खूप फायदा होतो. माशांमध्ये या आम्लाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मासे दृष्टी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

हेही वाचा: Health Tips : हिवाळ्यात मूळा खा; अन् असाध्य आजारावर मिळवा नियंत्रण

शांत झोपेसाठी फायदेशीर

जगभरातील असंख्य लोक निद्रानाशाचे बळी आहेत. यासाठी ब्लू लाइट आणि व्हिटॅमिन डी सारख्या पोषक तत्वांची कमतरता हे सर्वात मोठे कारण असू शकते. यावर उपाय म्हणून मासे खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. माशांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. ज्याचे नियमित सेवन चांगल्या झोपेसाठी खूप फायदेशीर मानले जाते.

हेही वाचा: Health Tips : गवतावर अनवाणी चालल्याने होतात फायदे, दररोज चाला इतके तास

ऑटोइम्यून रोगांचा धोका कमी होतो

रोजच्या आहारात माशांचे सेवन केल्यास टाइप 1 मधुमेहासह अनेक ऑटोइम्यून रोगांचा धोका कमी होतो. माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड, प्रथिने आणि व्हिटॅमिन डी भरपूर असते. जे संधिवात, मल्टिपल स्क्लेरोसिससारख्या गंभीर आजारांवरही गुणकारी आहे.