तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, कसे ओळखाल? जाणून घ्या लक्षणे

आपली रोगप्रतिकारशक्ती कमी आहे का, हे जाणून घेणे आवश्यक आहे
Symptoms of Weak Immunity
Symptoms of Weak Immunitysakal

कोणत्याही रोगास प्रतिकार करण्याचा अंगभूत गुण म्हणजे रोगप्रतिकारशक्ती होय. रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यास अनेक शारिरीक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आणि कोणत्याही आजाराशी लढा देण्यासाठी डॉक्टरांकडून बरेच सल्ले दिले जातात. मात्र अनेकदा त्याचा काहीही परिणाम होत नाही. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तीला वारंवार संक्रमण होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. (five symptoms of weakened immunity and try to increase immunity)

Symptoms of Weak Immunity
कोरोनाची चौथी लाट येतेय का? जाणून घ्या लक्षणे

मुळात आपली रोगप्रतिकारशक्ती कमी आहे का, हे जाणून घेणे आवश्यक आहे, तरच आपण योग्य ती काळजी घेऊ शकतो. कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीकडे निर्देश करणारी महत्त्वाची काही लक्षणे जाणून घेऊया.

१.सतत सुस्ती येणं

शरीरात सुस्तपणा जाणवणे हे कमकुवत प्रतिकारशक्तीचे (low immunity) प्रमुख लक्षण आहे. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे नियमित झोपल्यानंतरही तुम्हाला थकवा आणि सुस्तपणा जाणवतो.

२.जखम लवकर बरी न होणं

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने जखम लवकर बरी होत नाही. तुमची रोगप्रतिकारक शक्ती जितकी मजबूत असेल तितकी जखम लवकर आणि सहजपणे बरी होते.

Symptoms of Weak Immunity
पाठदुखीचा त्रास सतत छळतोय! करा घरगुती उपाय

३. चिडचिडेपणा येणे

तुमचे शरीर ठीक नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावरही दिसून येतो. त्यामुळे चिडचिड होणे हे कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीचे पहिले लक्षण आहे. अर्थात त्याची लक्षणे बाहेरून दिसत नाहीत, त्यामुळे जर तुम्हाला सतत थकवा आणि चिडचिड होत असल्याचं जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

४. वारंवार सर्दी होणे

जर तुम्हाला वारंवर सर्दी होत असेल तर तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर लक्ष देणे गरजेचे आहे. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना सर्दी खूप वेळा आणि अगदी सहज होते आणि असे लोक खूप लवकर आजारीही पडतात.

५. सतत पोटाच्या समस्या होणं

आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचा परिणाम हा आपल्या पचनतंत्रावरही पडतो.जर तुम्ही नियमितपणे पोटाच्या समस्यांनी ग्रस्त असाल तर ही कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीची लक्षणे असू शकतात.

Symptoms of Weak Immunity
उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होतोय, हे पाच उपाय नक्की करा

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खालील घरगुती उपाय करा.

आवळा:
आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. रोज आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून सामना केला जाऊ शकतो.

दालचीनी:
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दालचीनी अत्यंत उपयुक्त आहे. दालचीनीमध्ये ऍन्टी-ऑक्सिडेंट्स आणि ऍन्टी-बॅक्टिरीअल गुण असतात

लवंग:
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्‍शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. . लवंगात असलेल्या अँटी ऑक्‍सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

आले:
आले व तुळशीचा काढा एकदम गुणकारी. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखीवर हा काढा औषधी व रूचकर ठरतो.

हळदीचे दूध:
सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कप निघून जातो. दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com