
तुम्हाला आहे का बोटं मोडण्याची सवय? आत्ताच सोडून द्या नाहीतर...
अनेकांना बोटे मोडण्याची सवय असते. कित्येकदा घाबरुन किंवा कंटाळून बोटे मोडत असतात. अनेकदा बोटे मोडल्यावरुन घरचे मोठे रागवतात तर एवढंच काय तर रात्रीसुद्धा घरचे मोठे बोटे मोडू देत नाही. हे एकदा दोनदा ठीक आहे मात्र वारंवार तुम्ही असे करत राहिलात तर ती सवय होऊन जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? बोटे मोडणे तुमच्या आरोग्यासाठी किती वाईट आहे. जाणून घ्या बोटे मोडण्याचे दुष्परिणाम -
दुष्परिणाम-
१.या सवयीमुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास सतावू शकतो.
२. वारंवार बोटे मोडल्याने बोटांमध्ये ताण येतो. यामुळे हाडांना जोडणारे लिगामेंटचे सिक्रेशन कमी होऊ लागते. यामुळे हाडे एकमेकांशी रगडू लागतात.
३. सतत बोटे मोडल्याने बोटांच्या सांध्यांना सूज येते.
४. वारंवार तुम्ही बोटे मोडत असाल तर ही सांध्यांची सूज अधिकच वाढते. त्यामुळे बोटांना स्पर्श केल्यासही बोटे दुखू लागतात
बोटे मोडण्याची सवय अशी सोडवा-
१.हातामध्ये कायम पेन अथवा नाणे ठेवा.
२.हातामध्ये रबर ठेवा
३. तुमचे हाथ कायम व्यस्त राहतील.
४. याशिवाय डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.