
cholesterol कमी करायचा? उपाशी पोटी घ्या एक ग्लास दुधी भोपळ्याचा रस
उन्हाळ्यात शरिराला पाण्याची भरपूर आवश्यकता असते आणि दुधी भोपळ्यामध्ये 90 टक्के पाणी असते,त्यामुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन अधिक फायदेशीर (Beneficial) असते. दुधी भोपळा हा तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, जर तुम्ही दररोज एक ग्लास दुधी भोपळ्याचा रस प्यायला तर तुम्हाला अनेक आरोग्याचे फायदे मिळतील. दुधी भोपळ्याची भाजी खा किंवा त्याचा रस प्या. दुधी भोपळा हे निरोगी शरिरासाठी उत्तम औषध आहे. (Tips to Lower Cholesterol)
हेही वाचा: आमरससोबत हे तीन पदार्थ कधीही खाऊ नका
दुधी भोपळ्याचा रस पिण्याचे फायदे जाणून घ्या (Gourd juice Benefits)
१. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी दुधी भोपळ्याचा रस हा सर्वोत्तम उपाय आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास याचा रस प्यायल्याने सर्व जंतू शरिराबाहेर पडतात.
२. रिकाम्या पोटी एक ग्लास दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटते. या रसामध्ये 98 टक्के पाणी आणि अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत करतात. सोबत दुधी भोपळ्याचा रसामुळे शरीर थंड असते.
हेही वाचा: Onlinऔषध खरेदी करण्यापुर्वी या महत्वाच्या बाबी जाणून घ्या
३. दुधी भोपळ्याच्या ज्यूसमध्ये कॅलरी आणि फॅटचे प्रमाण खूपच कमी असते, त्यामुळे वजन कमी करण्यास दुधी भोपळा फायदेशीर आहे.
४. दुधी भोपळ्याच्या रस (200 ml) रिकाम्या पोटी प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते. हे रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे.
५. कठीण स्वरुपात शौचास होणे, पोट स्वच्छ न होणे, या समस्याचा तुम्ही सामना करत असाल तर एक ग्लास दुधी भोपळ्याचा रस प्या. यामध्ये असलेले फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
Web Title: Gourd Juice Is Good For Your Health Check List Of Benefits
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..