आमरससोबत हे तीन पदार्थ कधीही खाऊ नका |Healthy Lifestyle Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमरस

आमरससोबत हे तीन पदार्थ कधीही खाऊ नका

आजपासून आमरसाचा हंगाम सुरू होतोय. अक्षय तृतीयेपासून आमरस खाण्याची सुरवात होते. सध्या बाजारात आंब्याची मागणी वाढली आहे. आंबा खावा पण त्यासोबतच आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. आंबा किंवा आमरसासोबत कोणत्या गोष्टी खाणे टाळावे, हे देखील लक्षात असू द्या. जर या संदर्भात दुर्लक्ष केले तर आरोग्य आणि त्वचेवर याचा विपरीत परिणाम दिसून येतो.

हेही वाचा: उष्णता वाढल्यावर ताकात 'या' पाच गोष्टी टाका आणि पोटाचे विकार कायमचे दूर पळवा

१. पाणी (water)
आमरसाचा आस्वाद घेतल्यानंतर कधीच पाणी पियू नये. आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नये. तहान अगदीच कंट्रोल होत नसेल तर साधारण १५ मिनिटांनी त्यावर तिखट काहीतरी खा आणि मग पाणी प्या. शक्यतोवर आपण शेवटी आमरस घेत जेवण संपवित असतो. आणि त्यानंतर लगेच पाणी पित असतो पण हे चुकीचे आहे.

२. मसालेदार पदार्थ (spicy food)
जेव्हा जेवणात आपण आमरस खातो तेव्हा साधारण खूप मसाले भाज्या खाणे टाळावं. कारण आंबा पचायला जड असतो. अनेकांना आंबा जास्त खाल्ला तर ॲसिडिटीही होऊ शकते. त्यात मसालेदार पदार्थांमुळे आणखी ॲसिडीटीची होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो आंबा आणि मसालेदार पदार्थ एकत्र घेणं टाळा

हेही वाचा: 'रुह की गिजा'; जाणून घ्या अत्तराचा इतिहास आणि महत्त्व

३. दही (curd)

दही कोणत्याही फळासोबत खाणे, चुकीचे आहे. कारण आयुर्वेदानुसार ते विरुद्ध अन्न म्हणून ओळखले जातात. आपण सहसा मँगो लस्सी सुद्धा पितो मात्र मँगो लस्सी पिण्यापेक्षा मँगो मिल्कशेक घेतल्यास हरकत नाही.

Web Title: Do Not Eat These Foods With Mango Or Mango Juice

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top