Online औषध खरेदी करण्यापुर्वी या महत्वाच्या बाबी जाणून घ्या |Healthy Life style | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Medicines

Onlinऔषध खरेदी करण्यापुर्वी या महत्वाच्या बाबी जाणून घ्या

आजच्या काळात सर्वच ऑनलाइन झाले आहे. प्रत्येक हवी ती गोष्ट आपण एका क्लिकवरुन घरबसल्या मिळवू शकतो. माणसाला कधीही गरज पडणारी गोष्ट म्हणजे औषधे. त्यामुळे दिवसेंदिवस ऑनलाईन औषधींची मागणी वाढत आहे सोबतच कोरोनाने लोकांना ऑनलाईन औषधे वापरण्याची सवय लावली. असे अनेक प्रकारचे अॅप्स उपलब्ध आहेत, जे तुम्हाला आवश्यक असलेली औषधे काही तासांत तुमच्या दारात पोहोचवतात पण ऑनलाइन औषध खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे, तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. (While buying medicine online keep some tips in mind)

ऑनलाईन औषधी खरेदी करताना खालील टिप्स फॉलो कराव्यात.

१. प्रिस्क्रिप्शन तपासा

डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेल्या औषधांमध्ये तुमची औषधे तपासून बघा.

२. विश्वसनीय वेबसाइट

तुम्ही नेहमी विश्वसनीय वेबसाईट वरून औषधे घ्यावीत. तुम्ही ऑनलाइन औषधे खरेदी करता तेव्हा तुम्ही घेतलेली औषधे बनावट आहेत की नाही, याची माहिती मिळू शकत नाही. मात्र विश्वसनीय वेबसाइटवरून औषधे खरेदी केल्याने आपण योग्य औषधे घेऊ शकतो.

हेही वाचा: कडक उन्हाळ्यातही पाय दिसतील सॉफ्ट अन् स्मूथ; फॉलो करा 5 सोप्या टिप्स

३. डॉक्टरांशी बोला

औषधे घेतल्यानंतर, आपण आपल्या डॉक्टरांशी बोलणे आवश्यक आहे. आपण चुकीची औषधे घेत आहोत का, हे जाणून घ्या.

४. कंपनी जाणून घ्या

तुम्ही ज्या कंपनीकडून औषधे मागवली आहेत त्या कंपनीबद्दलच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. उदाहरणार्थ, कंपनीचे नाव, अटी व शर्ती, रिटर्न पॉलिसी इ. जर ती योग्य वेबसाइट असेल तर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे दिली जाणार नाहीत.

हेही वाचा: शरीरातील हाडे कमकुवत करणारे हे खाद्य पदार्थ तुम्ही खातात का?

५. बिल मिळवा

औषधे घेत असताना लक्षात ठेवा की तुम्हाला डिलिव्हरी बॉयकडून निश्चित बिल घ्यावे लागेल. त्यामध्ये तुम्ही ऑर्डर केलेल्या औषधांची सर्व माहिती असते

६. एक्सपायरी डेट तपासा.

सर्वात महत्त्वाचे ऑनलाइन औषधे खरेदी करताना, त्यांची एक्सपायरी डेट तपासा. एक्सपायरी डेट गेलेली औषधे आरोग्यास धोकादायक असतात.

Web Title: While Buying Medicine Online Keep Some Tips In Mind

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top