

Grapes Vs Raisins : फळे आणि सुक्या मेव्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. आज आपण द्राक्षे आणि त्यापासून बनवलेल्या बेदाण्यांविषयी जाणून घेणार आहोत. द्राक्षे हे असे फळ आहे ज्याची आंबट-गोड चव अनेकांना त्याकडे आकर्षित करते. दुसरीकडे, द्राक्षे सुकवून बेदाणे तयार केले जातात, जे अनेकांना आवडतात. याचा उपयोग मिठाई आणि गोड पदार्थ सजवण्यासाठी केला जातो. द्राक्षांमध्ये 80 टक्के पाणी असते, तर बेदाण्यांमध्ये पाण्याचे प्रमाण केवळ 15 टक्के असते.
बेदाण्यामध्ये जास्त कॅलरीज असतात
द्राक्षांपेक्षा बेदाण्यांंमध्ये जास्त कॅलरीज आढळतात. वास्तविक द्राक्षे सुकल्यानंतर बेदाणे तयार केले जातात. या प्रक्रियेत साखर आणि अँटिऑक्सिडंट्सचा वापर केला जातो ज्याचे कॅलरीजमध्ये रूपांतर होते. जर तुम्ही अर्धा कप द्राक्षे खाल्ले तर तुम्हाला फक्त 30 कॅलरीज मिळतील, त्याच प्रमाणात बेदाणे खाल्ल्यास शरीराला 250 कॅलरीज मिळतील.
बेदाणा खाण्याचे फायदे
बेदाणे हा फायबरचा समृद्ध स्रोत मानला जातो, याशिवाय या ड्रायफ्रूटमध्ये लोह आणि पोटॅशियम सारखी महत्त्वपूर्ण खनिजे आढळतात. बेदाण्यांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात, जे आतड्यातील बॅक्टेरिया संतुलित करण्यास मदत करतात.
द्राक्षे खाण्याचे फायदे
द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, हे दोन्ही पोषक आपल्या त्वचेच्या पेशींना तरुण ठेवण्यास मदत करतात. यासोबतच ते कँसरला जन्म देणार्या किरणांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करतात. द्राक्षांचे सेवन केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग आणि सुरकुत्या कमी होऊ लागतात.
बेदाणे आणि द्राक्षे यांमधे कोण जास्त आरोग्यदायी ठरेल?
दोन्ही गोष्टी आपापल्या परीने आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, परंतु द्राक्षे अधिक आरोग्यदायी मानली जातात कारण ज्यामध्ये कमी कॅलरी असते तो पदार्थ आरोग्यासाठी चांगलाअसतो. त्यामुळे फळ त्याच्या मूळ स्वरूपात खाण्याचा प्रयत्न करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.