लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करण्याची सवय आहे? पुरुषांना होऊ शकतो हा त्रास... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

laptop harmful uses

लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करण्याची सवय आहे? पुरुषांना होऊ शकतो हा त्रास...

कोविडच्या साथीच्या काळानंतर घरातून ऑफिसचे काम करण्याची संस्कृती खुप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लॅपटॉपचा वापर वाढला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? की लॅपटॉपचा जास्त वापर तुमच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम करू शकतो. दिवसभर लॅपटॉप वापरल्याने तुमच्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतो.

हेही वाचा: कोलकाता इथं kk ची हत्या? का होतेय CBI चौकशीची मागणी? नंदिता पुरी नाव चर्चेत

लॅपटॉपमधून निघणाऱ्या उष्णतेमुळे आपली त्वचा आणि अंतर्गत ऊतींचे हळुहळु नुकसान होण्यास सुरुवात होते. त्याच्यासोबत बराच वेळ मांडीवर बसून काम केल्यानेही पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते असे तज्ञांचे मत आहे. खरं पाहिल तर लॅपटॉपपेक्षा जास्त नुकसान त्याच्याशी जोडलेल्या वायफायमुळे होते कारण रेडिएशन हे इंटरनेट कनेक्शनशी संबंधित आहे.

हेही वाचा: भारतीय अधिकाऱ्यांचा गट तालिबानी नेत्यांच्या भेटीला; 'या' विषयावर चर्चा

आता पाहु या लॅपटॉपला मांडीवर ठेवून त्याचा वापर का करू नये? आणि त्यामुळे तुमच्या आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकते?

आपल्या मांडीवर लॅपटॉप घेऊन काम करण्याचे अनेक तोटे आहेत .जसे की पुरुषांमध्ये वंध्यत्वाचा धोका जास्त असतो.लॅपटॉपच्या उष्णतेमुळे महिलांपेक्षा पुरुषांचे जास्त नुकसान होऊ शकते. याचे कारण म्हणजे शरीराचा पोत. स्त्रियांमध्ये, गर्भाशय शरीराच्या आत स्थित असते, तर पुरुषांमध्ये, अंडकोष शरीराच्या बाहेर स्थित असतो, ज्यामुळे उष्णतेचे किरण जवळ राहतात. त्यामुळे पुरुषांनी लॅपटॉप वापरताना विशेष काळजी घ्यावी.

हेही वाचा: 'राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील बडा नेता पराभूत होणार'

उच्च तापमानामुळे शुक्राणूंची गुणवत्ता घसरुल्यामुळे तुम्हाला प्रजननक्षमतेमध्ये समस्या उद्भवू शकतात. वायफायद्वारे रेडिएशन पसरते- लॅपटॉपवर दीर्घकाळ काम करण्यापेक्षा हे वाईट आहे जेव्हा तुम्ही ते स्वतःच्या मांडीवर ठेवून वापरता.

हार्ड ड्राईव्हमधून कमी फ्रिक्वेंसी रेडिएशन उत्सर्जित होते, तर ब्लूटूथ कनेक्शनमधून तेच रेडिएशन बाहेर येते. रेडिएशनच्या प्रभावामुळे तुम्हाला निद्रानाश, तीव्र डोकेदुखी , स्नायू दुखणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

हेही वाचा: जैन यांच्यानंतर आता सिसोदियांचा नंबर; केजरीवालांनी केला मोठा दावा

त्यामुळे लॅपटॉपचा वापर करतांना तो पायावर किंवा मांडीवर ठेवण्याऐवजी टेबलावर ठेवून त्याचा वापर करा. काही लोक लॅपटॉप वापरताना पाय चिकटवून बसतात, त्यामुळे लॅपटॉपचे रेडिएशन थेट शरीरावर पडतात. उपकरणातून निघणारी उष्णता तुम्हाला आजारी बनवू शकते. आणि शेवटची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सतत लॅपटॉप वापरतांना एक तासानंतर पाच मिनिटे ब्रेक घ्या.

Web Title: Habit Of Carrying A Laptop On Your Lap Harmful For Body

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top