कोलकाता इथं kk ची हत्या? का होतेय CBI चौकशीची मागणी? नंदिता पुरी नाव चर्चेत Singer KK | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nandit Puri demands CBI probe into KK’s death

कोलकाता इथं kk ची हत्या? का होतेय CBI चौकशीची मागणी? नंदिता पुरी नाव चर्चेत

बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक(Bollywood Famous Singer) केके(KK) उर्फ कृष्णकुमार कुन्नथ याला अकाली मृत्यूनं गाठलं आणि आज तो आपल्यासोबत या जगात राहिला नाही. ३१ मे च्या मध्यरात्री त्याचं निधन झालं आहे. केके च्या कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या मृत्यूनं त्याच्या चाहत्यांच्या मनात मात्र असंख्य प्रश्न निर्माण केले आहेत. केकेच्या मृत्यूनंतर कॉन्सर्टमधनं जसजसे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ समोर येत आहेत आणि ज्या अपडेट मिळत आहेत,त्यांना पाहून लोकांच्या मनात शंका निर्माण होतायत अन् त्यांच्या रागाचा पारा देखील चढताना दिसत आहे. दावा केला जात आहे की,ऑडिटोरियममधील गर्दीवर कंट्रोल करण्यासाठी Fire Extinguisher मधनं CO2 सोडला गेला,इतकंच नाही तर फोम स्प्रे चा देखील वापर केला गेला. गायक केके सुद्धा घामानं पूर्ण भिजले होते आणि एसी ची तक्रार करताना देखील ते व्हिडीओ मध्ये दिसले आहेत.

हेही वाचा: अशोक सराफ @75: सेलिब्रेशनमध्ये चाहते होऊ शकतात सहभागी,कसं ते जाणून घ्या ...

या सगळ्या गोष्टींना पाहिल्यावर विरोधक आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडताना दिसत आहेत. तर हे सगळं कमी होतं की काय म्हणून आता अभिनते ओमपुरी यांच्या पुर्वाश्रमीच्या पत्नी नंदिता पुरी(Nandita Puri) यांनी देखील आपला राग व्यक्त केला आहे. नंदिता पुरी यांनी गायक केके च्या मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आणि कोलकातामध्ये लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान दिल्या जाणाऱ्या सुविधांवर देखील प्रश्न निर्माण केले आहेत. काय-काय झालंय थोडक्यात जाणून घ्या.

हेही वाचा: 'सरसेनापती हंबीरराव' पाहून राज ठाकरे चक्क २ तास...',तरडेंनी सांगितला किस्सा

केके चा कोलकाता इथं दोन दिवस लाइव्ह कॉन्सर्ट होता. ३० मे रोजी परफॉर्म केल्यानंतर केके ने ३१ मे रोजी देखील संध्याकाळी ७ वाजल्यापासून ९ पर्यंत नजरुल मंच ऑडिटोरियम मध्ये परफॉर्म केलं. याच दरम्यान केके ची तब्येत बिघडली आणि हॉस्पिटल जाताना रस्त्यातच त्याला मृत्यूनं गाठलं. केके ने छातीत दुखण्याची आणि अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार खरंतर केली होती. केके च्या मृत्यूनंतर त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमांचे निशाण दिसून आले आहेत,ज्यानंतर पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची तक्रार दाखल केली होती आणि त्यासंदर्भात चौकशी देखील सुरू केली होती. केके च्या मृत्यूनंतर जेवढ्या गोष्टी,खुलासे समोर आले आहेत त्यांना पाहून तरी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि यामुळे चाहत्यांचा राग देखील अनावर झाला आहे.

Nandita Puri Post on KK's Death In Kolkata

Nandita Puri Post on KK's Death In Kolkata

ओम पुरी यांच्या पुर्वाश्रमीच्या पत्नीनं म्हणजे नंदिता पुरी यांनी सोशल मीडियावर केके च्या अकाली मृत्यू संदर्भात पोस्ट करत आपला राग व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये कोलकाता मध्ये लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान दिल्या जाणाऱ्या सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. नंदिता पुरी यांनी लिहिलं आहे,''पश्चिम बंगालला लाज वाटली पाहिजे. कोलकाता मध्ये केकेची हत्या केली आहे. आता तिथलं सरकार त्यावर पांघरुण घालतेय. नजरुल मंच मध्ये कॉन्सर्ट दरम्यान कोणतीच काळजी घेण्यात आली नव्हती. अडीच हजार क्षमतेच्या सभागृहात ७ हजार लोक होते. एसी चालत नव्हता. केके घामानं ओलाचिंब झाला होता. त्यानं चार वेळा तक्रार केली पण कोणी त्याचं ऐकलं नाही. ना तिथे औषधाची काही सोय होती जेणेकरुन हॉस्पिटलला नेईपर्यंत तात्पुरते इलाज होऊ शकतील. या सगळ्यावर सीबीआय चौकशी झाली पाहिजे. आणि तोपर्यंत बॉलीवूडनं बंगालमध्ये परफॉर्म करण्यापासून स्वतःला लांब ठेवलं पाहिजे. बंगालला बॉयकॉट करा''.

Web Title: Nandit Puri Demands Cbi Probe Into Kks

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top