दुखापतमुक्त व्यायाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

health news take look at dos and donts of exercise and recovery

कसून व्यायाम करताना महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित भागांपैकी एक म्हणजे रिकव्हरी. फिटनेसमध्‍ये सुधारणा करण्‍याचे मार्ग शोधत असल्यास वर्कआउट रिकव्‍हरी हे रुटीन होईल. व्यायाम आणि रिकव्हरीच्या संदर्भात काय करावे आणि करू नये, याची माहिती घेऊयात...

दुखापतमुक्त व्यायाम

काय करावे

प्रोटिन आहार : प्रोटिन शरीराला दुरुस्त करण्यास मदत करतात. हायड्रेटेड राहण्यासाठी व्यायामादरम्यान आणि नंतर रिकव्हरीसाठी पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे रक्तदाबाची पातळी कायम राहते, किडनी कोरडी होत नाही तसेच शरीराचे तापमानही संतुलित राहते. व्यायामानंतर लगेच अंडी, स्प्राउट्स, यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ किंवा प्रोटिन शेक घ्या. व्यायामानंतर रिकव्हरी प्रक्रियेत आहार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

सांधे मालिश करणे : अधूनमधून मसाज केल्याने तुम्हाला अनावश्यक स्नायू दुखणे आणि क्रॅम्प्सपासून आराम मिळू शकतो. फोम रोलर आणि चांगले स्ट्रेचिंग रूटीन, स्नायू आणि सांधे मोकळे होतात.

संगीत थेरपी : व्यायामादरम्यान संगीत ऐकणे लक्ष केंद्रित करणे सोपे करते. व्यायामाचा अधिक आनंददायी अनुभव मिळू शकतो. ट्रेडमिलवर चालताना मोबाईल फोन वापरत नाही ना याची खात्री करा.

योग्य आहार आणि हायड्रेशन : सात्त्विक किंवा पोषक आहार व्यायामाच्या रिकव्हरीसाठी आवश्यक आहे. आपले शरीर नवीन टिशू तयार करण्यासाठी या आहारातून मिळालेले इंधन वापरते. शरीराला भरपूर फळे, भाज्या, मांसाहारी (आवश्यक असल्यास) आणि धान्य यांचा संतुलित आहार देण्याचा प्रयत्न करा. तुमच्यावर कामाचा बोजा असल्यास जेवणात पूरक आहाराचा विचार करावा.

एक दिवस सुट्टी घ्या : नियमित आणि उत्साही व्यक्तीने निरोगी राहण्यासाठी तसेच व्यायामाच्या योग्य रिकव्हरीसाठी, शरीराला विश्रांती देण्यासाठी कोणताही कठोर व्यायाम करण्यापासून एक दिवस सुट्टी घ्या. विश्रांती म्हणून पोहणे, सायकल किंवा चालविणे आणि स्ट्रेचिंग यासारख्या रंजक क्रिया करू शकता.

काय करू नये

स्ट्रेचिंग : स्ट्रेचिंग हा जबाबदारीने व्यायाम करण्याचा आणि वर्कआउट रिकव्हरीनंतरचा एक आवश्यक भाग आहे. सर्वोत्तम परिणामांसाठी, शारीरिक हालचाली करण्यापूर्वी आणि नंतर स्ट्रेचिंगचे नियोजन करा. स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी तुमच्या पाठीवर, हॅमस्ट्रिंग्ज, ग्लूट, पोटरीवर फोम रोलर वापरा. तुमचा व्यायामाचे रुटीन संतुलित राहण्यासाठी दररोज योगासने करू शकता.

झोपेकडे दुर्लक्ष नको : व्यायामाच्या पद्धतीमध्ये झोप महत्त्वाची आहे. झोपेकडे दुर्लक्ष करू नका. झोपेमुळे शरीराला तुम्ही फोकस करत असलेल्या स्नायूंच्या टिशूंना तंदुरुस्त राहण्यासाठी आणि तयार करण्यासाठी वेळ मिळतो. नियमित झोपेचे वेळापत्रक तयार केल्यास कोणत्याही नवीन व्यायामाला तोंड देण्यासाठी अधिक सुसज्ज असाल.

एकाच स्नायूवर काम करू नका : तुमच्या शरीराच्या फक्त एका भागावर काम करण्याची चूक करू नका. तुम्ही ॲब्स बनविण्यावर काम करत असल्यास केवळ तुमच्या कोअरवर लक्ष केंद्रित करणे स्वाभाविक वाटत असले तरी, यामुळे दुखापत होऊ शकते आणि चांगल्या परिपूर्ण वर्कआउटचा पूर्ण फायदा होऊ शकत नाही. व्यायामामध्ये नेहमी विविधता ठेवा. वजन, जमिनीवरील व्यायाम, योगासने, चालणे, टेकडी, पोहणे, सायकलिंग, जॉगिंग आणि मुख्य व्यायाम यासारखे संतुलित व्यायामाचे वेळापत्रक आठवड्याभरासाठी ठेवा. योग्य आणि फायदेशीर व्यायामाच्या रुटीनला चालना देण्यासाठी व्यायामातील रिकव्हरी महत्त्वाची आहे. आपले शरीर प्रत्येक गोष्टीची पूर्व कल्पना देत असते, त्याकडे दुर्लक्ष करू नका. अति व्यायाम टाळावा. त्याचे फायद्यापेक्षा तोटेच अधिक होतात.

Web Title: Health News Take Look At Dos And Donts Of Exercise And Recovery

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..