Health Tips: 'हे' आजार असलेल्या लोकांनी चुकूनही  रताळे खाल्यास होऊ शकतो भयंकर त्रास..

रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए जास्त असते. जर तुम्ही हिवाळ्यात जास्त रताळे खाल्ले तर शरीरात व्हिटॅमिन ए जास्त झाल्यामुळे तुम्हाला पुरळ आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
sweet potato
sweet potatoEsakal

Sweet Potato: थंडीचा हंगाम सुरू होताच लोकांना रताळ्याचे विविध प्रकार खायला आवडतात. रताळ्याला स्वीट पोटॅटो असेही म्हणतात.रताळी पौष्टिक आणि स्वादिष्ट असतात. रताळ्याचा गर पांढरा, पिवळट रंगाचा असतो, तर काही रताळी आतून केशरी रंगाची असतात. आपण उपवासाला रताळी आवडीने खातो. पण हिवाळ्यात हीच रताळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन चांगल्या प्रमाणात आढळतात.

रताळी उकळून, भाजून खाऊ शकता. यामुळे डायबिटिस, हृदयविकार आणि कॅन्सर चा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. रताळ्यामध्ये प्रथिने, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमसह कार्बोहायड्रेट्स, स्टार्च भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व आरोग्यास अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. पण तुम्हाला माहित आहे का, रताळे आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही काही लोकांनी ते खाणे टाळणेच योग्य आहे. का त्याचीच सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात पाहू या...

रताळ्यामध्येअसलेले पोटॅशियम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात. पण याचे जास्त सेवन केल्याने शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण वाढते. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला हायपरक्लेमियाची समस्या होऊ शकते. हायपरक्लेमिया हे हृदयविकाराचे मुख्य कारण बनू शकते.

sweet potato
Winter Recipe : हिवाळ्यात ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक भजी कसे तयार करायचे?

किडनी स्टोनची समस्या असेल तर रताळ्याचे जास्त सेवन करू नये. रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सलेट असते, जे एक प्रकारचे सेंद्रिय अॅसिड आहे. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या वाढू शकतेजर तुम्ही रताळ्याचे जास्त सेवन केले तर तुम्हाला एलर्जी होऊ शकते.

sweet potato
Health Tips: लाकडी घाण्यावरचे शुध्द तेल खाण्याचे फायदे...

रताळ्याला मॅनिटॉल-युक्त पदार्थ म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे काही लोकांना एलर्जीची समस्या होऊ शकते.रताळ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे. मधुमेह असल्यास रताळे खाणे टाळा.

sweet potato
Winter Recipe: नागपुरची स्पेशल खुसखुशीत पुडाची वडी कशी तयार करायची?

रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए जास्त असते. जर तुम्ही हिवाळ्यात जास्त रताळे खाल्ले तर शरीरात व्हिटॅमिन ए जास्त झाल्यामुळे तुम्हाला पुरळ आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com