esakal | coronavirus : 'या' तीन गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

बोलून बातमी शोधा

Corona
coronavirus : 'या' तीन गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष
sakal_logo
By
शर्वरी जोशी

राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. त्यामुळे या काळात स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रशासन व वैद्यकीय सेवेतील कर्मचारीदेखील वारंवार नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. यामध्येच डॉक्टर प्रविणकुमार जरग यांनी नागरिकांना कोरोना काळात कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केलं आहे.

दरम्यान,चीनच्या वुहान प्रांतातून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला कवेत घेतलं आहे. त्यामुळे या विषाणूपासून स्वत:चं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या संपूर्ण देशभरात लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे.