Depression: रात्री झोप येत नाही? हे असू शकतं डिप्रेशनचं लक्षण, वाचा सविस्तर | Health Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

depression

Depression: रात्री झोप येत नाही? हे असू शकतं डिप्रेशनचं लक्षण, वाचा सविस्तर

हल्ली अनेकजण डिप्रेशनचा शिकार होतात पण तुम्हाला माहिती आहे का, डिप्रेशन म्हणजे काय? डिप्रेशन दैनंदिन जीवनावर प्रभाव करते. डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये व्यक्तीला नेहमी उदास आणि निराश वाटते. एवढंच काय तर या आजारामुळे काही लोक आत्महत्या करतात. विशेष म्हणजे हे डिप्रेशन श्रीमंत- गरीब, स्त्री-पुरूष, लहान ते वयोवृद्ध म्हणजेच कुणालाही होऊ शकते. चला तर जाणून घ्या डिप्रेशनची लक्षणे काय आहे?

हेही वाचा: Mental Health : पुरुषही रडू शकतो, त्यालाही असते मानसिक आधाराची गरज!

थकवा -

डिप्रेशनचा शिकार झालेल्या लोकांना सातत्याने थकवा जाणवतो. कोणत्याही कामावर लक्ष केंद्रीत होत नाही आणि चिडचिड निर्माण होते. थकव्यासोबत तुम्हाला उदास वाटत असेल तर कदाचित डिप्रेशनचे लक्षण आहे.

छातीचे दुखणे -

छातीचे दुखणे हे सहसा ह्रदयाचा किंवा पोटांच्या आजारांशी संबंधीत असतात पण कधी कधी हे डिप्रेशनचेही लक्षण असू शकते. यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधून त्वरीत उपचार करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Better Mental Health : उत्तम मानसिक आरोग्यासाठी 'हे' पदार्थ खा

डोकेदुखी -

डोकेदुखी सुद्धा डिप्रेशनचे लक्षण आहे. मात्र हे डोकेदुखी मायग्रेनसारखे तीव्र नसते. या डोकेदुखीत डोके ठणकत राहते.

पोटदुखी -

सहसा पोटदुखी म्हटले की आपल्याला वाटते की अपचनामुळे हा त्रास उद्भवतोय पण कधी कधी डिप्रेशनमुळेही पोटदुखी होते. पोटदुखी हे सुद्धा डिप्रेशनचे एक लक्षण आहे.

स्नायुंचे दुखणे -

अनेकांना स्नायुंचे दुखणे असते. पण तुम्हाला माहिती आहे का स्नायुंचे दुखणे सुद्धा एक प्रकारे डिप्रेशनचे लक्षण असते.

हेही वाचा: Bone Health : या सवयींमुळे तुमची हाडे कमकुवत होऊ शकतात

निद्रानाश-

झोप न येणे म्हणजेच निद्रानाश हे सर्वात मोठे डिप्रेशनचे लक्षण आहे. यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.

डोळ्यांच्या समस्या-

डोळ्यांच्या समस्या सुद्धा डिप्रेशनचे लक्षण असते. त्यामुळे अक्षरे वाचताना अंधुक दिसणे. हे सुद्धा डोळ्याचे लक्षण आहे.