Weight loss: वजन झटपट कमी करण्यासाठी हे प्रथिनयुक्त '6' अन्न पदार्थ खावे.

तुमचे वाढलेले वजन कमी करण्यात प्रथिने खूप मोठी भूमिका निभावतात.
Protein Food For Weight Loss
Protein Food For Weight Lossesakal
Updated on

Protein foods for weight loss:

तुमचे वाढलेले वजन कमी करण्यात प्रथिने खूप मोठी भूमिका निभावतात, जर तुम्हाला तुमचे वाढलेले वजन हेल्दी पद्धतीने कमी करायचे असेल, आणि एक परफेक्ट फिगर बनवायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात कोणत्या हाय प्रोटीन पदार्थांचा समावेश करावा याचीच सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला जे 6 अन्नपदार्थ सांगणार आहोत ते सर्व पदार्थ प्रथिनांनी भरलेले आहेत.या पदार्थाच्या सेवनामुळे तुमचं वाढलेले वजन लवकर कमी होईल आणि सोबतच तुमचं शरीर मजबूत बनेल. वाढलेले वजन कमी करणे हे खरचं अवघड काम आहे.हे वजन कमी करण्यासाठी अनेकदा लोक जिममध्ये जातात, व्यायाम करतात, तरीही त्यांचे वजन कमी होत नाही. यावर तज्ज्ञांचे मत असे आहे की, तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला व्यायामा ऐवढीच प्रथिनांनी भरलेल्या आहाराची सुध्दा गरज असते.त्यामुळे वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्यायामासोबत प्रथिनांनी भरलेल्या आहाराची सेवन करणे, कारण या आहारात कॅलरीज कमी असतात, आणि या आहारामुळे स्नायूंच्या वाढीस चालना देखील मिळते.

वजन कमी करण्यासाठी प्रथिने खूप महत्वाचे आहेत. यामुळे स्नायू मजबूत होतात आणि वजन कमी होते. चला तर मग आता बघू या उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ कोणते आहेत ?

● स्टिर फ्राई वेजिटेबल:

हे विविध पौष्टिक भाज्यांचे एकत्रितपणे केलेले मिश्रण आहे. स्टिर फ्राई वेजिटेबलमुळे तुम्हाला प्रथिनांसह विविध पोषक तत्वे देखील मिळतील.स्टिर फ्राई वेजिटेबल ही कमी-कॅलरी असलेली इंडो-चायनीज डिश आहे. इतर कोणत्याही रेसिपीपेक्षा खायला वेगळी वाटणारी आणि तुमच्या पोटांची भूक भागवणारी पदार्थ म्हणजे स्टिर फ्राई वेजिटेबल आहे. यात सर्व पौष्टिक भाज्या थोडा तेलात तळून मग त्यात मसाले, आणि चीज टाकले जातात.

● रोस्टेड फुलकोबी:

फुलकोबी ही भरपूर पोषक तत्त्वांनी भरलेली असते आणि फुलकोबीत चरबीचे प्रमाण कमी असते. वाढलेले वजन कमी करण्याऱ्यासाठी ही एक चांगली भाजी आहे. फक्त रोस्टेड फुलकोबी तयार करतांना जास्त तेल आणि मसाले घालू नये. तसेच या भाजीत बटाटे घालणे देखील टाळावे.

Protein Food For Weight Loss
वजन घटवण्यासाठी उपयुक्त ऑलिव्ह तेल आणि लिंबाचा रस

● उकडलेली अंडी:

अंडी हे उच्च प्रथिनांचा उत्तम आणि सर्वसामान्य माणसांला परवडेल असा स्रोत आहे यात शंका नाही. जर तुमचे वजन कमी होत नसेल तर तुम्ही नाश्त्यात अंड्यांचा समावेश करावा. हे उकडलेली अंडी अधिक पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही त्यात हिरव्या पालेभाज्या देखील घालू शकता.

● स्प्राउट्स चाट:

स्प्राउट्स चाट ही अगदी सोपी रेसिपी आहे.ही रेसिपी तुम्ही भिजवलेला राजमा, भिजवलेली मूग डाळ आणि भिजवलेले काळे हरभरा मिक्स करून बनवू शकता. त्यात कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून लिंबाचा रस टाकला तर स्प्राउट्स चाट हा खायला अजूनच चवदार लागू शकतो.

Protein Food For Weight Loss
Health Tips: वजन कमी करण्यासाठी अ‍ॅपल साइडर व्हिनेगर घेताय? होऊ शकतात या 5 गंभीर समस्या

● बेक्ड चिकन

बेक्ड चिकन म्हणजे भाजलेल चिकन या मुगलाई रेसिपीमध्ये प्रथिने जास्त असतात आणि कॅलरीज कमी असतात. ते तयार करतांना फक्त तेल वापरू नका. या पदार्थ तुमची भुक देखील होईलच पण तुमचे वजनही नियंत्रणात राहील.

● क्विनोआ सॅलड

क्विनोआ, थोडी बाजरी, राजमा आणि काही भाज्या एकत्र करून सॅलड बनवा. हे मिश्रण प्रोटीन आणि फायबरचा खजिना आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी अधिक चांगला ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com