Himalayan Viagra : हिमालयातला व्हायग्रा बर्फामुळे होतोय नष्ट; किंमत १२ लाख रुपये किलो

३ हजारांहून अधिक कुटुंबं आपल्या उदरनिर्वाहासाठी यावर अवलंबून आहेत.
Himalayan Viagra
Himalayan ViagraSakal

यंदाच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे दुर्मिळ आणि महागडा हिमालयीन व्हायग्रा खराब होण्याच्या मार्गावर आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे व्हायग्रा तीन फूट खाली दबून गेला आहे. त्यामुळे बरंच नुकसान झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

१२ हजार फूट उंचीवर पिथौरगढच्या काही भागामध्ये हिमालय व्हायग्रा उगवतो. पण बर्फवृष्टीमुळे आता तो बर्फाखाली दबून गेला आहे आणि खराबही झाला आहे. एप्रिलचा शेवटचा आठवडा ते जूनच्या मध्यापर्यंत उगवतो. याचा व्यापार करणारे याची किंमत १० ते १२ लाख रुपये किलो असल्याचं सांगतात.

Himalayan Viagra
Rajarshi Shahu Maharaj : मुलाच्या मृत्यूनंतर ऐश्वर्याचा त्याग केला; कसे होते शाहू महाराजांचे शेवटचे दिवस

पिथौरागढच्या मुनसियारी ब्लॉकमधील मिलम, बुई पाटो, सपोलो, क्विरिजिमिया, कुलथम, धुर्तोली अशा ६-७ गावांतील ग्रामस्थ खोऱ्यात जाऊन तंबू ठोकतात. दिवसभर औषधी वनस्पती निवडतात. आता सर्व गावकरी परतले आहेत. मुनसियारी येथील रहिवासी सुंदर कोरंगा यांनी सांगितले की, बर्फाखाली वनस्पती दबल्याने वनौषधींचा शोध घेणं अशक्य झालं आहे.

Himalayan Viagra
No diet Day : वजन कमी करण्यासाठी मन मारू नका; बिनधास्त खा पण या टिप्स फॉलो करा...

धारचुला येथील रहिवासी विकी चिरळ यांनी सांगितलं की, ३ हजारांहून अधिक कुटुंबं आपल्या उदरनिर्वाहासाठी या औषधी वनस्पतीवर अवलंबून आहेत. बर्फ वितळल्यानंतर, आम्ही ते गोळा करण्यासाठी जातो, परंतु यावेळी आम्हाला खूप त्रास सहन करावा लागेल. यावेळीही अशीच स्थिती राहिल्यास आपले मोठे नुकसान होणार आहे. तसेच सांगितले की आम्हाला आशा आहे की बर्फामुळे औषधी वनस्पती नष्ट झाली नसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com