esakal | इन्ग्रोन टोनेल्सची समस्या हाेईल दूर; हे आहेत घरगुती उपाय

बोलून बातमी शोधा

Ingrown Toenail

इन्ग्रोन टोनेल्सची समस्या हाेईल दूर; हे आहेत घरगुती उपाय

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : इन्ग्रोन टो-नेल्सची समस्या सर्वसामान्य बाब आहे. ते कोणालाही होऊ शकते. या समस्येत पायाचे अंगठ्याचे नख असाधारण पद्धतीने वाढू लागतात. याने क्युटिकल्स कट होतात. त्याने सूज आणि जखमी होते. याचे अनेक कारण असू शकतात. या समस्येवर वेळीच उपचार केला नाहीतर त्याचा खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे दररोज पायाची स्वच्छता कराच. जर तुम्हाला इन्ग्रोन टो-नेल्सच्या समस्येने त्रस्त असाल तर या घरगुती उपायांचा अवलंब करा....

१. बेकिंग सोड्याने पाय स्वच्छ करा
बेकिंग सोडा हा चांगला एक्सफोलिएटर आहे. त्वचेवर चिकटलेली घाण आणि मृत त्वचेला बेकिंग सोड्याने चांगल्या प्रकाराने साफ केले जाऊ शकते. तसेच अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियलही आहे.


साहित्य
- १ मोठा चमचा बेकिंग सोडा
- १/२ मोठे चमचे पाणी

कृती
- एका वाटीत बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करुन घ्या
- ते पायाच्या अंगठ्यावर लावा
- १५-२० मिनिटांसाठी ते अंगठ्यावर राहू द्या
- नंतर तुम्ही पाय धुवून घ्या
- असे तुम्ही नियमित करा. जोपर्यंत तुम्हाला इन्ग्रोन टोनेल्सची समस्येपासून सुटका मिळत नाही तोपर्यंत.

टीप - तुम्ही गरम पाण्यात बेकिंग सोडा आणि सुंठ टाकून काही वेळासाठी पाय त्यात बुडून बसू शकता. याने तुम्हाला त्रासापासून सुटका मिळेल.


माझे लग्न 26 एप्रिलला आहे, मला पळवून न्या.. तुमची पुष्पा, आय लव्ह यू

नारळ तेल
- त्वचेसाठी नारळ तेल गुणकार आहे. तुम्हाला कोणतीही जखम. अॅलर्जी किंवा त्वच संसर्गात नारळ तेल वापरु शकता. ते अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल प्राॅपर्टीजयुक्त असते.

साहित्य
- १ छोटा चमचा नारळ तेल
- एक काॅटन पॅड

कृती
- नारळ तेल थोडेसे गरम करुन घ्या
- आता हे तेल अंगठ्याच्या नखावर लावा
- रात्री झोपण्यापूर्वी हे वापरणे चांगले राहिल.

टीप - तुम्ही नारळ तेलात चिमुठभर हळदीही टाकू शकता. याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो.
३. हळदी
- हळदी अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी असते. तुम्ही इन्ग्रोन टोनेल्सची समस्या दूर करण्यात याचा वापर करु शकता.

साहित्य
- १ छोटा चमचा हळद
- १/२ छोटे चमचे सरसोचे तेल

कृती
- तेल आणि हळदी चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या
- आता हे मिश्रण अंगठ्यावर लावा
- तुम्ही ते काॅटनच्या बांधू ही शकता.
- या घरगुती उपायाने तुम्हाला खूप आराम मिळेल.

टीप - हळद तुम्ही पाण्यात टाकूनही जखमवर लावू शकता. यानेही जखम भरणे आणि त्रासापासून सुटकारा मिळू शकते.

या गोष्टी लक्षात ठेवा
- पायाच्या नखांच्या समस्येवर ट्रिम करत राहा
- नखे कापण्यासाठी कटरचाच वापर करा. तोंडाने नखे कापू नका
- पायांची नियमित स्वच्छता ठेवा
- योग्य प्रकारचे चप्पल वापरत चला
- पायांचा कमीत-कमी धूळ, मातीच्या संपर्कात येईल याकडे लक्ष द्या.

Don't Worry! साताऱ्यात उभारणार 'Oxygen Cylinder'चे पाच प्लॅंट; Covid रुग्णांना दिलासा

डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.