Eye Flu Remedies: आय फ्लूमध्ये ही चूक केल्यास येईल अंधत्व, लक्षणं दिसताच वेळीच करा उपचार

डोळे येणं हा एक संसर्गजन्य आजार असून यात डोळ्यातील बुबुळांच्या सभोवताली इन्फेक्शन पसरून दाह जाणवतो. अनेकदा या आजाराची योग्य काळजी न घेतल्यास दृष्टी कमी होणं किंवा कायमची जाणं अशा गंभीर समस्या निर्माण होवू शकतात
डोळे आल्यावर घ्यायची काळजी
डोळे आल्यावर घ्यायची काळजीEsakal

दिल्लीसह देशभरामध्ये आय फ्लूचा Eye Flue संसर्ग वाढताना दिसतोय. सर्वच वयोगटातील लोकांना आय फ्लूची लागण होताना दिसतेय. खास करून लहान मुलांना या आजाराचा लवकर संसर्ग होत आहे. How to care Conjunctivitis and what care to be taken in eye flue

खरं तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये Monsoon Season हवेतील आर्द्रतेमुळे बॅक्टेरिया आणि विषाणूचं प्रमाण वाढल्याने आय फ्लूचा Eye Flue आजार पसरताना दिसतो. आय फ्लू म्हणजेच ज्याला आपण सामान्य भाषेत डोळे येणं असं म्हणतो. वैज्ञानिक भाषेत या आजाराला कंजक्टिव्हायटीस Conjunctivitis असं म्हणतात.

हा एक संसर्गजन्य आजार असून यात डोळ्यातील बुबुळांच्या सभोवताली इन्फेक्शन पसरून दाह जाणवतो. अनेकदा या आजाराची योग्य काळजी न घेतल्यास दृष्टी कमी होणं किंवा कायमची जाणं अशा गंभीर समस्या निर्माण होवू शकतात.

यासाठीच आय फ्लू किंवा डोळे येण्याची लक्षण जाणून घेऊन त्यासाठी वेळीच काळजी घेणं आणि प्रसंगी डॉक्टरांकडे जाऊन योग्य औषधोपचार सुरु करणं गरजेचं असतं.

आय फ्लूची लक्षणं

डोळे लाल होणं

डोळ्यांमधून सतत पाणी येत राहणं

डोळ्यांमध्ये पांढरी घाण जमा होणं

डोळ्यांमध्ये सतत खाज आणि जळजळ होणं तसचं काही वेळेस वेदना देखील होतात.

डोळ्यांभोवती सूज येणं

काही प्रसंगी डोळे आल्यावर धुसरं ही दिसू लागतं.

हे देखिल वाचा-

डोळे आल्यावर घ्यायची काळजी
Eye Care : डोळ्यांच्या साथीपासून वाचायचं असेल तर डोळ्यांचं नुकसान करणारे हे पदार्थ टाळाच

असा पसरू शकतो आय फ्लू

डॉक्टरांच्या मते Eye Flu म्हणजेच डोळे येणं हा आजार संसर्गजन्य असलेल्याने तो एकामुळे दुसऱ्या व्यक्तीला होवू शकतो.. डोळे आलेल्या व्यक्तीच्या शिंकण्यामुळे, खोकल्याने किंवा आय कॉन्टेक्टमुळे देखील हा आजार पसरू शकतो.

तसंच स्पर्श किंवा डोळे आलेल्या व्यक्तीचा रुमाल तसचं टॉवेल वापरल्याने देखील हा आजार पसरण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळेत अनेकदा कुटुंबातील एका व्य़क्तीला डोळे आल्यास इतरही सदस्यांना आय फ्लू होण्याची शक्यता जास्त असते.

अशी घ्या काळजी

आय फ्लू किंवा डोळ्यांची साथ पसरलेली असताना सतत डोळ्यांना स्पर्श करणं टाळा

डोळे आलेल्या व्यक्तींनी इतरांना संसर्ग होवू नये यासाठी काळा चष्मा किंवा गॉगल वापरावा.

डोळे पुसण्यासाठी केवळ स्वच्छ रुमाल किंवा कापड वापरावं.

डोळे आल्यास टीव्ही किंवा मोबाईल पाहणं टाळा.

सतत हात धुवत रहा.

तसंच कोमट पाण्याने डोळे स्वच्छ करा.

सुती कापडाने डोळे कोरडे करा.

दृष्टी जाण्याचा धोका

डॉक्टरांच्या मते डोळे येणं हा तसा सामान्य आजार आहे. सुरुवातीला एका डोळ्याला संर्सग झाल्यानंतर तो दुसऱ्या डोळ्याला होतो आणि साधारण १-२ आठवड्यात हा संसर्ग दूरही होतो. मात्र जर तुम्ही संसर्ग झाल्यानंतर योग्य काळजी घेतली नाही. तसचं वेळीच औषधोपचार केले नाहीत तर दृष्टी जाण्याचा धोका निर्माण होवू शकतो.

यासाठी आय फ्लूची लक्षण दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांमध्ये आयड्राप टाकतात. मात्र चुकीचे आयड्राप टाकल्याने गंभीर समस्या निर्माण होवू शकते. यासाठीच कायम डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आयड्राॅप्सचा वापर करावा.

हे देखिल वाचा-

डोळे आल्यावर घ्यायची काळजी
Eye Flu: डोळे आलेल्या रुग्णांनी चुकूनही या 4 चुका करू नये, नाहीतर...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com