
तुम्ही फ्रिजमधील थंड पाणी पिता का? हार्ट रेट कमी होऊ शकतो
उन्हाळ्यात थंड पानी प्रत्येकाला हवं असतं.यात उन्हाळ्यात आपण फ्रिजमधील पाणी पिण्यास प्रथम प्राधान्य देतो अनेकांना फ्रिजमधील पाणी पिणे किंवा बर्फ खाणे खुप आवडते. तुम्हाला जर फ्रिजमधील पाणी आणि बर्फाचे पाणी पिण्यास आवडत असेल,तर तुमच्या शरिरासाठी योग्य नाही, हे समजायला हवं. फ्रिजमधील पाणी आणि बर्फाचे पाणी पिण्याची सवय असेल तर ती सवय प्रथम सोडायला हवी. अन्यथा याचे शरिरावर होणारे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.
तुम्ही फ्रिजमधील थंड पाणी पित असाल तर कोणते दुष्परिणाम तुमच्या शरिरावर होतात, हे जाणून घ्या.
हेही वाचा: शिळी पोळी फेकू नका, याचे फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
१. घश्यांत इन्फेक्शन
जेव्हा तुम्ही फ्रिजमधील थंड पाणी पिता तेव्हा त्याचा थेट परिणाम घश्यांवर होतात. ज्यामुळे घश्यांचे विविध इनफेक्शन होऊन घसा खवखवण्याची शक्यता देखील वाढू शकते.
२. पचनक्रियेत अडथळा
निरोगी शरीरासाठी पचनक्रिया उत्तम असणे, अत्यंत आवश्यक असते, थंड पाण्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. पचनक्रियेवर परिणाम झाल्याने तुमच्या शरीरातील अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.
हेही वाचा: cholesterol कमी करायचा? उपाशी पोटी घ्या एक ग्लास दुधी भोपळ्याचा रस
३ पोषणमुल्ये कमी होतात
शरीराचे तापमान साधारणपणे ३७ अंश सेल्सिअस असते. पण जेव्हा तुम्ही कमी तापमान असलेले पेय पिता तेव्हा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होतात.त्यामुळे शरीराला पोषणमुल्ये कमी प्रमाणात मिळतात.
४. हार्ट रेट कमी होतात
थंड अथवा बर्फाचे पाणी पिल्यामुळे हार्ट रेट कमी होण्याची शक्यता असते. थंड पाण्यामुळे एक वेगस नावाची नस उत्तेजित होते. ही १० वी क्रॅनिअल नर्व्ह असल्याने ती शरीराच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्यामुळे ही नस उत्तेजीत झाली तर हार्ट रेट कमी होऊ शकते.
Web Title: If You Drink Cold Water From Fridge Be Careful Check Side Effects
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..