Sleep Disease | छोट्याशा आवाजानेही झोपमोड होते का ? मग आहे गंभीर आजारांचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sleep Disease

Sleep Disease : छोट्याशा आवाजानेही झोपमोड होते का ? मग आहे गंभीर आजारांचा धोका

मुंबई : तुम्हाला झोपेची गरज नसेल; पण तुमच्या शरीराला आणि मेंदूला खूप गरज असेल. म्हणूनच तज्ञ दररोज ७-८ तास झोपण्याचा सल्ला देतात. परंतु काही लोकांना झोपेशी संबंधित समस्या असतात, ज्यामुळे ते पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत.

यामध्ये निद्रानाश, स्लीप एपनिया, रात्री वारंवार लघवी होणे, घोरणे, झोपेत चालणे इ. पण तुम्हाला माहीत आहे का की अपुरी झोप हा देखील झोपेमधील अडथळा असू शकतो.

अपुऱ्या झोपेची समस्या असणारी व्यक्ती अगदी छोट्याशा आवाजानेही जागी होते. अशा लोकांमध्ये चिडचिड जास्त असते. त्यांच्या एकूण आरोग्यावरही परिणाम होतो.

अशा परिस्थितीत, झोप अपुरी राहण्याची कारणे आणि पुरेशी झोप घेण्याचे उपाय जाणून घेऊ, ज्यामुळे तुम्हाला निरोगी राहाता येते. हेही वाचा - पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

हेही वाचा: Physical Relation : मासिक पाळी सुरू असताना लैंगिक संबंध कसे ठेवाल ?

मधुमेह

अपुऱ्या झोपेची समस्या असणाऱ्यांमध्ये मधुमेहाचा धोका जास्त असतो. अशा लोकांना रात्री वारंवार उठल्यामुळे पुरेशी झोप लागत नाही.

जर तुम्ही नियमितपणे ७ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर तुमची इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढू शकते.

परिणामी दुसऱ्या दिवशी जास्त भूक लागून जास्त अन्न पोटात जाते व तुमची रक्तातील साखर अनियंत्रित होते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जातो.

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर म्हटले जाते कारण त्याची लक्षणे सहसा कोणाच्या लक्षात येत नाहीत आणि भविष्यात ते हृदयविकाराचे कारण देखील बनू शकते. अपुरी झोप तणाव वाढवण्याचे काम करते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका अनेक पटींनी वाढतो.

हृदयरोग

कमी किंवा अपुरी झोप ही कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयविकाराचा धोका वाढवणारे घटक यांच्याशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत जर तुमची झोप नीट होत नसेल तर तुमचे हृदय धोक्यात येऊ शकते.

हेही वाचा: Period Leave : महिलांना मासिक पाळीसाठी भरपगारी रजा मिळणार ? याचिका दाखल

लठ्ठपणा

झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात हार्मोन्सचे असंतुलन निर्माण होते, जे जास्त खाणे आणि लठ्ठपणाला प्रोत्साहन देते. जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा या हार्मोन्सचे उत्पादन वेगाने वाढते, ज्यामुळे भूक लागते.

अशाप्रकारे पुरेशी झोप घ्या

जर तुमची लगेच झोपमोड होत असेल तर तुम्हाला दररोज पुरेशी झोप मिळत नसण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत अपुरी झोप तुम्हाला लहान ते घातक आजारांना बळी पाडू शकते.

म्हणूनच रोजच्या ७-८ तासांच्या झोपेच्या सवयीमध्ये काही गोष्टींचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये दररोज एकाच वेळी झोपणे, झोपण्याच्या ६० मिनिटे आधी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर न करणे, दुपारी झोपणे टाळणे, रात्री हलके अन्न खाणे यांचा समावेश आहे.

टॅग्स :InsomniaSleep