Risk of cervical cancer in womenesakal
आरोग्य
Cervical cancer in women : महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी तपासणीला प्राधान्य देणे आवश्यक !
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमधील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमुख कारण ठरत आहे. दरवर्षी ७६,००० महिलांचा या रोगामुळे मृत्यू होतो. त्यामुळे भारतातील महिलांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वसामान्य कर्करोग ठरतो. हा आजार टाळता येण्यासारखा आहे. मात्र भारतीय जनता गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग आणि त्याच्या जोखमींबाबत अनभिज्ञ आहे, ज्यामुळे उशिरा निदान होते आणि मृत्यूदर वाढतो.
- रुपेश कदम
भारतामध्ये दर आठ मिनिटांनी एका महिलेचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू होतो. ही हृदयद्रावक सत्यता परिस्थितीची गंभीरता दर्शवते. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमधील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमुख कारण ठरत आहे. दरवर्षी ७६,००० महिलांचा या रोगामुळे मृत्यू होतो.

