High Blood Pressure: उच्च रक्तदाब टाळण्यासाठी जांभूळ बियांचे चूर्ण रामबाण उपाय

ऋतुमानानुसार उन्हाळ्यात आंब्यानंतर येणाऱ्या जांभूळ फळाला आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे.
High Blood Pressure
High Blood PressureSakal

jamun Seed Powder Remedies to Prevent High Blood Pressure

डॉ. राघवेंद्र नादरगी, आयुर्वेदाचार्य, सोलापूर

ऋतुमानानुसार उन्हाळ्यात आंब्यानंतर येणाऱ्या जांभूळ फळाला आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. विविध पोषक सत्त्व असलेले हे फळ मानवी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मधुमेही रुग्णांसाठी अधिक लाभदायी मानले जाणारे हे फळ मुबलक प्रमाणातील पोटॅशियममुळे स्ट्रोक, उच्च रक्तदाब टाळण्यासाठी मदत करणारे तर भरपूर प्रमाणातील अँटीऑक्सिडंट्समुळे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस चालना देणाऱ्या रॅडिकल पेशींविरुद्ध काम करणारे मानले जाते.

तुरट, गोड चवीचे जांभूळ केवळ चवीसाठी नाही तर मानवी आरोग्यासाठी सुपरफूड मानले जाते. त्यात अनेक औषधी आणि आरोग्यदायी फायदे आहेत. त्यातील पोषक जीवनसत्त्वांमुळे मानवी प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. जांभूळ खाल्ल्याने त्वचेत कोलेजन तयार होण्यास मदत होते. वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असल्यास त्याच्या खाण्याने आराम मिळू शकते. तर त्यातील झिंक आणि व्हिटॅमिन सी मुळे खोकला, श्वसनाच्या इतर गुंतागुंत टाळण्यास मदत होऊ शकते.

तसेच जांभूळ दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ते ज्यूस, व्हिनेगर, गोळ्या, कॅप्सूल आणि चूर्ण यांसारख्या इतर प्रकारांतूनही सेवन केले जाते. त्यात विविध प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या उत्पादनांचा व्यवसायही वाढला आहे.

High Blood Pressure
Parenting Tips: उन्हाळी सुटीत मुलांशी गट्टी कशी जमवायची, जाणून घ्या टिप्स
  • फळासह साल, पाने, बियाही उपयुक्त

हे केवळ फळच नाही तर त्याच्या झाडाची साल, पाने आणि बियाही खूप फायदेशीर असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. त्याविषयी आयुर्वेदाचार्य डॉ. राघवेंद्र नादरगी म्हणाले, कडक उन्हाची मानवी शरीराला बाधा होऊ नये, यासाठी नैसर्गिकरीत्या वसंत ऋतूत हे फळ येते. यातील तुरट रसाने मुखशुद्धी तर गोडवा मनाला आल्हाददायक म्हणजे तृष्णा शमवणारी आहे.

साल जखम स्वच्छ करण्यासाठी न्यग्रोधादि गण या मिश्रणात वापरली जाते. पानाचा ओवा, नारळाच्या पाण्यासह काढा केल्यास जुलाब थांबतो. तर बी रुक्ष आहे. मधुमेहात शरीरात जलीय भाव वाढतो. तो कमी करून रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम बियांचे चूर्ण करते.

  • जांभळातील पोषक घटक

जांभूळ फळात पाणी, प्रथिने, लिपिड्स (फॅट्स), कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन सी, थायमिन, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी-६, व्हिटॅमिन ए यासारखे पोषक घटक असतात.

मोठा व गोड जांभळात जास्त गर असतो. तो खाण्यासाठी चांगला असतो. मात्र, लहान, कमी गर असलेला व चवीने तुरट असलेला जांभुळ अधिक औषधी गुणांनी युक्त असतो. त्यामुळे रुग्णांनी त्याचा वापर करावा. जांभूळ जास्त खाल्ल्यास बद्धकोष्ठता वाढते. तसेच ते वात तयार करते. त्यामुळे बद्धकोष्ठता, संधीवात असलेल्यांनी ते अधिक खाऊ नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com