Parenting Tips: उन्हाळी सुटीत मुलांशी गट्टी कशी जमवायची, जाणून घ्या टिप्स

Parenting Tips: उन्हाळी सुटीत मुलांना खेळू द्या, बागडू द्या अन् नात्यांमध्ये रमू द्या
Parenting Tips:
Parenting Tips: Sakal

Learn tips on how to make friendship with kids during summer vacation

वर्षातील जवळपास दहा ते साडेदहा महिने मुले शाळेत आणि पालक ड्युटीवर असे चित्र असते. कामाच्या ताणतणावात दिवसभर थकूनभागून आल्यानंतर पालक मुलांशी फारसे बोलत नाहीत. मग हळूहळू मुलेही दूरदूर राहायला लागतात.

जवळजवळ मुले अन् पालकांची कट्टी असल्यासारखेच वातावरण घरात असते. आता मुलांना उन्हाळी सुटी लागतेय. हा काळ पालक, मुले अन् नातेवाइकांशी संबंध दृढ करण्यासाठी सुवर्णकाळ आहे. सुटीत दोन महिने विद्यार्थी पालकांसोबत राहणार आहेत. या काळात मुलांशी गट्टी कशी जमवायची याचा हा गृहपाठ.

गेल्या 10 महिन्यांपासून तुमच्या मुलांची शाळा, शिक्षकांनी पूरेपूर काळजी घेतली. आता पुढील दोन महिने ते तुमच्यासोबत असतील. मुलांचा सुटीचा काळ त्यांच्यासाठी उपयुक्त आणि आनंदी ठरायला हवा. त्यासाठी मुलांसोबत किमान दोन वेळा जेवण करा. त्यांना शेतकऱ्यांचे महत्त्व आणि त्यांच्या मेहनतीबद्दल सांगा, म्हणजे ते अन्न वाया घालवणार नाही. जेवल्यानंतर त्यांना स्वतःची ताटं स्वतः धुवू द्या.

अशा कामांतून मुलांना मेहनतीची किंमत कळेल. त्यांना तुमच्याबरोबर स्वयंपाक करण्यास मदत करू द्या. त्यांच्यासाठी भाज्या किंवा सॅलड तयार करू द्या. तीन शेजाऱ्यांच्या घरी जा. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या. आजी-आजोबांच्या घरी आवर्जून जा आणि त्यांना मुलांमध्ये मिसळू द्या. त्यांचे प्रेम आणि भावनिक आधार तुमच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यासोबत फोटो काढा. त्यांना तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा जेणेकरून तुम्ही कुटुंबासाठी किती मेहनत करता हे त्यांना समजेल.

  • विविध शिबिरांची पर्वणी

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागताच मुलामुलींना वेध लागतात ते विविध शिबिरांचे. कलाकौशल्य शिकत नव्या मित्रमैत्रिणींसह धमाल करण्याची संधी मुलांना शिबिरांमधून मिळते. यंदाही अशाच शिबिरांची पर्वणी मुलांना मिळणार असून त्यात संस्कार, पारंपरिक कलेसह काही हटके शिबिरांचा समावेश आहे.

Parenting Tips:
Parenting Tips: उन्हाळ्यात लहान मुलांच्या त्वचेची घ्या खास काळजी, येणार नाहीत घामोळ्या

दरवर्षीप्रमाणे यंदाही नाटक, संगीत, नृत्य, चित्रकला, हस्तकला आदी विविध विषयांवरील शिबिरे शहरात होणार आहेत. नृत्य प्रकारात कथ्थक, भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारांसह कंटेम्पररी, बॉलिवूड आदी प्रकारांच्या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. शिवाय पारंपरिक खेळ, गिर्यारोहण आदींची प्रशिक्षण शिबिरेही असतात. तसेच युद्धकला, मर्दानी खेळ, अबॅकस, विज्ञान प्रशिक्षण ते अगदी रोबोटिक्स, कोडिंग अशा हटके आणि वेगळ्या विषयांवरील शिबिरांचेही आयोजन केले जात आहे.

उन्हाळी सुटीत पालकांसाठी गृहपाठ

  • मुलांना तुमच्या बालपणीच्या आठवणी आणि कौटुंबिक इतिहास सांगा.

  • टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, , इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर ठेवा.

  • तुमच्या मुलांना बाहेर जाऊन खेळू द्या, त्यांना एकदातरी दुखापत होऊ द्या

  • खेळताना पडणे आणि वेदना सहन करणे त्यांच्यासाठी चांगलेच आहे.

  • सोफा कुशनसारखे आरामदायी जीवन तुमच्या मुलांना आळशी बनवेल.

  • तुमच्या मुलांसाठी रंगीबेरंगी चित्रांसह काही दर्जेदार कथांची पुस्तके आणा.

  • किचन, गार्डन तयार करण्यासाठी मुलांना बिया पेरण्यास प्रवृत्त करा.

  • मुलाच्या विकासासाठी झाडे आणि वनस्पतींबद्दल जाणणे महत्त्वाचे आहे.

  • चॉकलेट, केक, चिप्स, पेये, बेकरी उत्पादने देणे टाळा.

  • मुलांच्या डोळ्यात पहा, तुम्हाला अद्भुत भेट दिल्याबद्दल देवाचे आभार माना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com