Kidney Transplant : किडनी प्रत्यारोपणानंतर निरुपयोगी किडनीचे डॉक्टर काय करतात?

मधुमेह आणि हाय बीपी या दोन गोष्टींमुळे किडनी निकामी होण्याचा धोका सर्वाधिक आहे.
Kidney Transplant
Kidney TransplantSakal

What Happens With Damaged Kidney After Transplant : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांच्या किडनीचे प्रत्यारोपण केले जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, RJD सुप्रीमो 24 नोव्हेंबरला किडनी प्रत्यारोपणासाठी सिंगापूरला रवाना होणार आहे.

हेही वाचा : मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

Kidney Transplant
Kidney health tips: 'या' पाच गोष्टी सतत खात राहाल तर तुमची किडनी काम करणं बंद करेल

मात्र, आपल्यापैकी अनेकांना किडनी प्रत्यारोपणानंतर खराब झालेल्या किडनीचे डॉक्टर नेमकं काय करतात असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला याचबाबत मार्गदर्शन करणार आहोत. सर्वात पहिले आपण किडनी निकामी होण्याची कारणे जाणून घेऊया.

Serious Kidney Diseases
Serious Kidney Diseasesesakal
Kidney Transplant
World Kidney Day 2022: तुम्ही दिवसातून ७-८ वेळा लघवीला जाता ? असू शकतात ही लक्षणे

किडनी निकामी होण्याची कारणे

किडनी खराब झाल्यानंतर त्याचे प्रत्यारोपण केले जाते. मधुमेह आणि हाय बीपी या दोन गोष्टींमुळे किडनी निकामी होण्याचा धोका सर्वाधिक आहे. रक्तातील हाय शूगर आणि हाय बीपीमुळे किडनीच्या मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे किडनी काम करणे थांबवते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब व्यतिरिक्त किडनेचे जुने आजार आणि दारूसारख्या वाईट सवयींमुळेदेखील किडनी खराब होते.

किडनी निकामी होण्याची प्रारंभिक लक्षणं

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, किडणी निकामी होण्याच्या पहिल्या टप्प्यात अनेकदा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पण काही दिवसांत अति थकवा, मळमळ आणि उलटी, वारंवार मूत्रविसर्जन हात, घोट्या आणि चेहऱ्यावर सूज येणे, भूक न लागणे आदी लक्षणे दिसून येतात.

Kidney Transplant
Ginger In Tea : फक्कड चहासाठी नेमकं आलं टाकायचं कधी? पाणी गरम झाल्यावर की, उकळी आल्यावर

निरुपयोगी किडनीचे डॉक्टर काय करतात?

ज्या रूग्णाची किडनी निकामी होत त्याच्या शरिरातून निरूपयोगी किडनी काढून टाकली जाते, असे जर तुम्हाला वाटत असेल तर, ते शरिरातच ठेवले जाते. UCSF च्या शस्त्रक्रिया विभागानुसार, नवीन किडनी पोटाच्या खालच्या भागात पुढे प्रत्यारोपित केली जाते. मात्र, जर किडनीमुळे हाय बीपी किंवा किडनी संसर्गासारख्या समस्या उद्भवत असतील तर ती काढून टाकली जाते.

किडनी प्रत्यारोपणासाठी किती खर्च येतो?

किडनी प्रत्यारोपणाचा खर्च हॉस्पिटल, सर्जनची फी आणि मेडिक्लेम कव्हरवर अवलंबून असतो. साधारणपणे यासाठी अंदाजे खर्च सरकारी रुग्णालयात 4 लाख ते 7 लाख आणि खासगी रुग्णालयात 20 लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. वरील माहिती आणि येथे दिलेल्या माहितीमध्ये तफावत असू शकते. त्यामुळे अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com