Arm Fat: हातावरील अतिरिक्त चरबी कशी घालवाल? कतरिना अन् दीपिकाच्या ट्रेनरने सांगितले हे व्यायाम

आज आपण तुमच्या हातावर असलेली अतिरिक्त चर्बी कशी कमी करायची ते जाणून घेणार आहोत
Arm Fat
Arm Fatesakal

Weight Loss Workout: वजन कमी कराण्यासाठी तुम्ही अनेक टीप्स फॉलो करत असता. मात्र शरीरावरील प्रत्येक भागाचं वजन कमी झालं तर तुमचं संपूर्ण वजन कमी होऊ शकते. तेव्हा आज आपण तुमच्या हातावर असलेली अतिरिक्त चर्बी कशी कमी करायची ते जाणून घेणार आहोत.

यास्मिन कराचीवाला ही कतरिना कैफ, दिपीका पादुकोण सारख्या बॉलीवूड सेलिब्रिटींची ट्रेनर आहे. तिने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्ट्राग्रामवर एक व्हिडीओ शेअर केले होते. यावेळी तिने हाताच्या स्नायूंना टोनिंग करताना खांद्यावर आणि हाताच्या चरबीवर फोकस करणारे सहा व्यायाम सांगितले.

तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे की ही एक फास्ट होणारी आणि प्रभावी अशी खांद्याची कसरत आहे. यासाठी तुम्हाला फक्त तीन मिनिटे लागतील. ब्रेक न घेता वर्कआउट ३० सेकंदासाठी करा.

खांद्याची कसरत अर्धा तास केल्यास तुमचं भरपूर वजन कमी होऊ शकते.

शोल्डर सर्कल्स अँड रिवर्स सर्कल

खांद्याची वर्तुळे आणि रिव्हर्स व्यायाम खांदे आणि ट्रॅप स्नायूंना फोकस करतात. ते खांद्याची हालचाल आणि लवचिकता सुधारण्यास मदत करतात. याने तुमच्या खांदा मजबूत होतो आणि तुमच्या हातावरील चरबी कमी होते.

पाय खांद्याच्या रूंदीला वेगळे ठेवून सरळ उभे राहा. या व्यायामात तुम्हाला तुमचे हात वर्तुळात गोल गोल फिरवायचे आहेत. असे केल्याने तुमच्या हातावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. लवकरच या व्यायामाचा तुम्हाला फायदा होईल.

पल्स फ्रंट, बॅक, अप आणि डाऊन

हे व्यायाम सक्रिय स्नायूंना वेगळे करते आणि त्यांना अधिक थकवते. ज्यामुळे त्यांची सहनशक्ती वाढण्यास मदत होते. हे व्यायाम खांदे, बायसेप्स आणि ट्रायसेप्स देखील टोन करतात, पाठीच्या वरच्या बाजूस काम करतात, तुमची स्नायूंची ताकद वाढवतात, तुमच्या दुखापतीचा धोका कमी करतात आणि तुमची मुद्रा सुधारतात.

Arm Fat
Health Care: उभे राहून औषधे खाणं योग्य की अयोग्य? वाचा काय सांगतात तज्ज्ञ

पाय खांद्याच्या रूंदीपासून वेगळे करून सरळ उभे राहा. हात तुमच्या बाजूला जमिनीला समांतर ठेवा. हाताच्या या व्यायामात तुम्हाला हात वर आणि खाली करून हा व्यायाम करायचा आहे. तुम्ही 50 चा सेट करू शकता. जोपर्यंत तुम्हाला एनर्जेटीक फिल होत नाही तोपर्यंत हा व्याायाम सुरू ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com