Gandhi Jayanti : वैष्णव भोजन ते कित्येक किलोमीटरची पदयात्रा, महात्मा गांधी यांच्या फिटनेसचे रहस्य काय होते?

गांधीजींनी अनेक सत्याग्रह केलेत. कित्येक किलोमीटर पायी चालत यात्रा काढल्या
Gandhi Jayanti
Gandhi Jayantiesakal

Gandhi Jayanti 2023 : सत्य आणि अहिसेंच्या मार्गाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे महात्मा गांधी अनेकांचे आदर्श आहेत. त्यांचे विचार आणि त्यांची शिस्तप्रियता हे गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहेत. गांधीजींनी अनेक सत्याग्रह केलेत. कित्येक किलोमीटर पायी चालत यात्रा काढल्या. त्यांच्या आरोग्याबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

गांधीजींच्या आहारात असे काय असायचे ज्या कारणाने ते एवढे अॅक्टिव्ह असायचे. सोबतच त्यांच्या झोपण्याच्या, उठण्याच्या आणि जागण्याच्या सवयीतून हे लक्षात येते की दिवसाची सुरुवात योग्यप्रकारे झाली की तुम्ही मानसिकदृष्ट्यासुद्धा फिट असता.

काय आहे गांधीजींच्या फिटनेसचे रहस्य

१) वेळेत झोपणे आणि वेळेत जागणे

गांधीजींच्या फिटनेसमधील महत्वाचा मुद्दा म्हणजे वेळेत झोपणे आणि वेळेत उठणे. andhiashramsevagram.org मते, गांधीजी सकाळी ४ वाजता उठायचे आणि रात्री ९ वाजता झोपायचे.

२) वैष्णव भोजन

गांधीजी सकाळी ७ वाजता नाश्ता करायचे. त्यांच्या खाण्यात आलं, लसूण, कांदे यांचा वापर नसायचा. असे सांगितले जाते की गांधीजी साखर आणि मीठ फार कमी प्रमाणात खायचे. त्यांच्या जेवणात घरचे अन्न, फळे आणि भाज्या यांचा समावेश होता. गांधीजी ११ वाजता जेवण करायचे आणि संध्याकाळी ५ वाजता जेवायचे.

३. फास्टिंग

गांधीजी बरेच उपवास करायचे. ज्यामुळे त्यांचे शरीर फार जास्त अॅक्टिव्ह असायचे. इतरांच्या तुलनेत ते न थकता त्यांचे काम पूर्ण करायचे. गांधीजींकडून तुम्ही फिटनेससाठी आठवड्यातून एक तरी उपवास ठेवणे आणि मीठ व सारखेचा त्याग करणे या गोष्टी घेऊ शकता. (Health)

Gandhi Jayanti
Mahatma Gandhi : खरंच राष्ट्रपिता गांधींमुळे झाले अखंड भारताचे तुकडे?

४. पायी चालणे

गांधीजी नाश्त्यापूर्वी रोज ५ किलोमीटर पायी चालायचे. याशिवाय आजूबाजूच्या भागातही पायी चालायचे. त्यांच्याकडून निरोगी आरोग्यासाठी ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. रोज पायी चालल्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकारांच्या आजारांपासून तुम्ही कायम दूर राहाल. (Mahatma Gandhi)

Gandhi Jayanti
Mahatma Gandhi Jayanti : महात्मा गांधींचे ९ विचार जे तुम्हालाही देतील जगण्याचा नवा मार्ग

५. उन्हात बसून ऑइल मसाज करा

गांधीजी रोज सकाळी ८-१० उन्हात बसून बॉडी मसाज करायचे. मसाज केल्याने हाडे निरोगी राहतात आणि तुमची इम्युनिटीही वाढते. या उपायाने अनेक आजारांपासून तुमचा बचाव होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com