Periods मधील वेदना कमी करण्यासाठी Pen killer खाणं धोकादायक, या घरगुती उपायांनी मिळेल आराम

Painkillers during the period: मासिक पाळीत पेनकिलर गोळ्यांमुळे तात्पुरता आराम मिळत असला तरी या गोळ्यांचा भविष्यात आरोग्यावर दुष्परिणाम होवू शकतो. यासाठीच मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
avoid painkillers in period
avoid painkillers in periodEsakal

Painkillers during the period: मुलींना मासिक पाळी सुरु झाली म्हणजे मुलगीही Girl जाणती झाली असं आजही अनेक भागांमध्ये म्हंटलं जातं. साधारण वयाच्या १२व्या वर्षी मासिक पाळीला सुरूवात होते ते ५० वयापर्य़ंत महिलांना मासिक पाळी येते.

खास करून मासिक पाळीला Menstrual Cycle सुरुवात झाल्यानंतर ते ३० वय असे पर्यंत महिलांना मासिक पाळीमध्ये विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. Marathi Health Tips Avoid pain killers in Menstrual Cycle

मासिक पाळीमध्ये Menstrual Cycle पोटातील प्रंचंड वेदना, डोकेदुखी, जांघांमध्ये वेदना, अधिक रक्तस्त्राव, मळमळ, चक्कर येणं अशा विविध समस्या महिलांना Women उद्भवतात.

मासिक पाळीचे ५-७ दिवस या समस्यांचा Problems सामना करत महिलांना त्याची दररोजची कामं करावी लागतात. अशात वेदनांपासून Pain आराम मिळावा यासाठी अनेकजनी पेनकिलर औषधांची मदत घेतात. 

मासिक पाळीत पेनकिलर गोळ्यांमुळे तात्पुरता आराम मिळत असला तरी या गोळ्यांचा भविष्यात आरोग्यावर दुष्परिणाम होवू शकतो.

यासाठीच मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे तुम्हाला वेदनांचा त्रास कमी होईल. शिवाय त्याचे दुष्परिणाम देखील होणार नाहीत. 

मध आणि हळद- मासिक पाळीतमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी मध आणि आल्याचा रस हा एक प्रभावी उपाय आहे. एक चमचा मध आणि एक चमचा आल्याचा रस एकत्रित करून त्याचं सेवन करावं. यामुळे वेदना कमी होतील. तसचं पोटदुखी, मळमळ या समस्याही कमी होतील. 

हे देखिल वाचा-

avoid painkillers in period
Menstrual cycle : मासिक पाळी वेळेत येत नाही? 'या' पाच सवयी आताच बदला…

मनुका आणि केशर- मासिक पाळीमध्ये सुरुवातीचे १ ते २ दिवस पोटदुखी आणि पोटात वेदना येण्याने महिलांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी कोणतही काम करणं देखील कठीण होतं.

यासाठी काळे मनुका आणि केशर उपायकारक ठरू शकता. यासाठी रात्री एका वाटीत ५-६ काळे मनुका भिजत ठेवा. तसचं दुसऱ्या वाटीत केशराच्या ३-४ काड्या भिजवा. सकाळी याचं सेवन करावं.

मनुका आणि केशराच्या सेवनाने पोटातील क्रॅम्प्स कमी होतील. तसचं मासिक पाळीमध्ये रक्तस्राव होत असल्याने महिलांमध्ये आयरनची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र मनुका आणि केशराच्या सेवनाने शरीराला पुरेस आयरन मिळेल. 

दालचिनी चहा- मासिक पाळीदम्यान तुम्हाला दालचिनीचा Cinnamon tea चहा पिणं फायदेशीर ठरू शकतं. कारण दालचिनीमध्ये सिनामेट, सिनामिक ऍसिड तसंच यातील सिनामल्डडिहाइडमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीइन्फ्लामेटरी म्हणजेच दाहक-विरोधी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात.

मासिक पाळी दरम्यान महिलांना पोटात आणि पोटाच्या खालच्या भागात वेदना होतात. या वेदना रोखण्यासाठी दालचिनीचा चहा मदत करू शकतो.

एक कप दालचिनी चहा बनवण्यासाठी दीड कप पाणी उकळत ठेवा. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्याच दालचिनी पावडर टाका. cinnamon tea recipe दोन मिनिटे उकळल्यानंतर हा चहा गार करून गाळून पिऊ शकता.

हिंगाचं सेवन- मासिक पाळीमध्ये पोटाच्या खालाच्या भागामध्ये वेदना होतात. जर तुम्हीला प्रत्येत महिन्याच मासिक पाळीच्या पोटातील वेदनांनी त्रस्त केलं असेल तर त्यासाठी पाळीच्या दिवसांमध्येच नव्हे तर नियमित हिंगाचं सेवन करावं. 

हिंगाच्या सेवनामुळे पोटाच्या खालच्या भागातील स्नायू मजबुत होतात. तसचं त्यांची लवचिकता वाढते यामुळे मासिक पाळीत पोटदुखीचा त्रास कमी होतो. 

हे देखिल वाचा-

avoid painkillers in period
Curd in Periods : मासिक पाळी सुरू असताना दही खावे की नाही ?

तुळस- तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. तुळस ही एक नैसर्गिक पेनकिलर म्हणून काम करते. यामुळे मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी तुळस उपयुक्त ठरते. यासाठी तुम्ही कपभर पाण्यामध्ये तुळशीची ८-१० पानं उकळून तुळशीच्या चहाचं सेवन करु शकता. यामुळे आराम जाणवेल. 

गरम पाण्याचा शेक- मासिक पाळीतील पोटातील वेदना तसचं कंबरदुखी यापासून आराम मिळावा यासाठी गरम पाण्याचा शेक दिलासा देणारा ठरु शकतो. मासिक पाळीतील सुरुवातीच्या दिवसांमध्ये पोट आणि कंबर गरम पाण्याच्या पिशवीने शेकवल्यास आराम पडेल. 

मेथीचं पाणी- मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी मेथी फायदेशीर ठरेल. यासाठी रात्रभर मेथी भिजत ठेवावी . सकाळी मेथीचं पाणी प्याव. यामुळे वेदना  कमी होतील. 

यासोबतच मासिक पाळीतील त्रास कमी व्हावा यासाठी पुरेस पाणी प्यावं. तसचं हिरव्या भाज्या आणि फळांचं सेवन करावं 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com