‘या’ Healthy Drinksच्या मदतीने कोलेस्ट्रॉलची समस्या होईल छूमंतर!

काही ड्रिंक्सच्या मदतीने तुम्ही रक्त वाहिन्यांमध्ये साचलेलं बॅड कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर काढू शकता. हे कोलेस्ट्रॉल डिटॉक्स ड्रिंक्स कोणते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
healthy drinks to lower cholesterol level
healthy drinks to lower cholesterol levelEakal

Healthy drinks: वाढतं कोलेस्ट्रॉल ही अलिकडे वाढत जाणारी समस्या बनली आहे. कोलेस्ट्रॉल Cholesterol म्हणजेच मुळात बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखणं गरजेचं आहे असं आपण अनेकदा ऐकलं असेल. मात्र हे बॅड कोलेस्ट्रॉल कसं नियंत्रणात आणायचं? याबद्दल तुम्हाला माहित आहे का? Marathi Health Tips Healthy Drinks to Control Bad Cholesterol

खरं तर दररोज अनेकजण मोठ्या प्रमाणात जंक आणि तळलेल्या पदार्थांचं Junk Food सेवन करत असतात. हे सर्व पदार्थ शरीरातील रक्त वाहिन्यांमध्ये Blood Vessels बॅड कोलेस्ट्रॉल (low-density lipoprotein) म्हणजेच लिपिड प्रोफाइल कोलेस्ट्रॉल LDL वाढवण्याचं काम करत असतात.

जंकफूड किंवा तेलकट पदार्थांमधून निघणारे फॅट्स हे रक्तवाहिन्यांमध्ये दीर्घ काळासाठी चिटकून बसतात आणि यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याचा धोका वाढतो. यासाठी हे LDL रक्त वाहिन्यांमध्ये चिटकून राहणार नाही यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारमध्ये काही ड्रिंक्सचा समावेश करू शकता. cholesterol detox drink

काही ड्रिंक्सच्या मदतीने तुम्ही रक्त वाहिन्यांमध्ये साचलेलं बॅड कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर काढू शकता. हे कोलेस्ट्रॉल डिटॉक्स ड्रिंक्स कोणते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे देखिल वाचा-

healthy drinks to lower cholesterol level
Summer healthy drinks: किचनमधील पदार्थांपासून बनवा उन्हाळ्यासाठी ड्रिंक्स, पोटाला मिळेल आराम

अॅलोव्हेरा लेमन डिटॉक्स ड्रिंक- अॅलोव्हेरा लेमन ड्रिंक तुमच्या रक्त वाहिन्या स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरेल. कोरफडीचा गर हा एखाज्या जेलप्रमाणे असतो जो कोलेस्ट्रॉलच्या कणांना चिटकून राहू शकतो. तर दुसरीकडे लिंबामध्ये असलेलं सिट्रिक ऍसिड एखाद्या स्क्रब प्रमाणे काम करतं. यामुळे नसांमध्ये चिटकलेलं कोलेस्ट्रॉल बाहेर पडण्यास आणि ते फ्लश आउट होण्यास मदत होते.

टोमॅटो ज्यूस- रोजच्या स्वयंपाकात जरी तुम्ही टोमॅटोचा समावेश करत असलात तरी कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी तुम्हाला टोमॅटोचा ज्यूस अधिक फायदेशीर ठरू शकतो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचं संयुग मोठ्या प्रमाणात आढळतं. ज्यामुळे लिपिड पातळी सुधारण्यास मदत होते आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणं शक्य होतं. Tomato juice For bad cholesterol 

यासोबतच टोमॅटो ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि नियासिन कंपाउंड असतं ज्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होण्यास आणि ब्लॉकेज दूर होण्यास मोठी मदत होते. 

ग्रीन टी ओट्स ड्रींक- ग्रीन टी ओटस् ड्रीक हे जर तुम्हाला ऐकायला विचित्र वाटत असलं तरी हे कोलेस्ट्रॉल डिटॉक्स ड्रिंक तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यास उपयुक्त ठरू शकतं. यासाठी तुम्हाला ओट्स आणि ग्रीन टीची काही पानं एकत्र वाटून घ्यायची आहेत. ही पावडर तुम्हाला पाण्यात मिसळून तयार ड्रिंकचं सेवन करायचं आहे. Green tea oats drink to control ldl

ओट्समधील फॅटस् बॅड कोलेस्ट्रॉलच्या लिपिड कणांना रक्तवाहिन्यांमधून बाहेर फेकण्याचं काम करतं. तर ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स नसांना डिटॉक्स करण्यासोबतच LDL कमी करण्यास मदत करतं. 

डाळिंबाचा ज्यूस- डाळिंबामध्ये इतर फळांच्या तुलनेत अँटीऑक्सिडंट्स प्रमाण अधिक असतं. डाळिंबाचा ज्यूस रक्तवाहिन्यांच कार्य सुरळीत करून ब्लड सर्कुलेशन चांगलं होण्यास मदत करतो. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये काळं मीठ टाकून त्याचं सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होवून हृदय निरोगी राहण्यास मदत होते. 

हे देखिल वाचा-

healthy drinks to lower cholesterol level
Summer Drinks : फक्त 10 रुपयांत मिळणाऱ्या या गोष्टी करतील उन्हापासून बचाव...

संत्र्याचा ज्यूस- संत्र्याचा ज्यूस आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो. या ज्यूसमध्ये फॅट्स आणि सोडियमचं प्रमाण शून्य असतं. संत्र्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे विटामिन आणि खनिजं कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.  इतकचं नव्हे तर चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास यामुळे मदत होते. Orange juice benefits 

संत्र्याचा ज्यूस शरीर डिटॉक्स करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामुळे किडनी संबंधी आजारांचा धोका कमी होतो. सकाळी नाश्त्यावेळी तुम्ही संत्र्याचा ज्यूस पिऊ शकता. यामुळे दिवसभरासाठी चांगली एनर्जी देखील राहते. 

या काही कोलेस्ट्रॉल डिटॉक्स ड्रिंक्सच्या मदतीने तुम्ही LDL नियंत्रणात ठेवू शकता. खास करून तुम्ही जेव्हा जंक फूड किंवा तेलकट पदार्थ खाता तेव्हा त्यासोबत एखादं सॉफ्ट ड्रिंक न घेता अशा एखाद्या डिटॉक्स ड्रिंकचा किंवा ज्यूसचा पर्याय तुम्ही निवडल्यास ते फायदेशीर ठरू शकतं. 

टीप - हा लेख सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. उपचारात वापर करण्यापूर्वी आपल्या वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com