Summer Drinks : फक्त 10 रुपयांत मिळणाऱ्या या गोष्टी करतील उन्हापासून बचाव...

काही स्वस्त पर्याय अगदी १० रुपयांत सुद्धा तुम्हाला उष्णतेपासून वाचवू शकतील...
Summer Drinks
Summer Drinksesakal

Summer Drinks : मे महिना सुरु होतो आहे अशात उन्हाळा किती त्रास देईल याची कल्पनाही करायला नको. साधं बाहेर जायचं म्हटलं तरी उन्हाचा चटका लागतो. अशात कडक उन्हापासून वाचणं कठीण आहे.

आपल्याकडे असे लोकं सापडण जरा कठीण ज्यांना उन्हाळा आवडतो. यामुळे बहुतांश लोकांना उन्हाळ्यापेक्षा हिवाळा जास्त आवडतो. उन्हाळ्यात डिहायड्रेशन किंवा सनस्ट्रोकमुळे खूप त्रास होतो.

हे शक्य तितके घरात राहून टाळता येते, पण शरीराला अन्नाद्वारे देखील हायड्रेटेड ठेवता येईल. आपण सतत एसी चालू ठेवून बसू शकत नाही कारण त्यामुळे खिशाला छान कात्री बसेल. अशात काही स्वस्त पर्याय अगदी १० रुपयांत सुद्धा तुम्हाला उष्णतेपासून वाचवू शकतील.

Summer Drinks
Stay Fit In Summer : उन्हाळ्यात कसं असाव Food Routine? पाळाल तरच उन्हाळा सोसवेल, नाहीतर...

दही किंवा ताक

दही किंवा ताक उन्हाळ्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुपारच्या जेवणासोबत एक ग्लास ताक पिणे एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. हे पोटात निर्माण होणारी उष्णता आणि आम्लपित्त आपल्यापासून दूर ठेवते. याशिवाय दह्याचे सेवन फायदेशीर ठरु शकते.

Summer Drinks
Summer Heat Rise : उन्हाच्या तडाख्याने शीतपेयांच्या विक्रीत वाढ!

एक ग्लास सब्जा

बाजारात अवघ्या काही रुपयांत मिळणाऱ्या सब्जापासून उत्तम सरबत बनवता येते. हे पोटात उष्णता निर्माण होऊ देत नाही आणि त्याचे सर्वात महत्वाचे म्हणजे ते उष्माघातापासून आपले संरक्षण करते. एक ग्लास पाण्यात रात्री दोन चमचे सब्जा टाकून सकाळी उठून प्या.

Summer Drinks
Summer Drink : उन्हाळ्यातील या पेयांमुळे मन होईल शांत, अॅलर्जी आणि अॅसिडिटीपासून मिळेल मुक्ती

काकडी

उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने खूप फायदे होतात. सुमारे ९० टक्के पाण्याने भरलेली काकडी उन्हाळ्यात खूप फायदेशीर मानली जाते आणि ती स्वस्त देखील आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते काकडीचे ज्यूस किंवा जेवणात सॅलड म्हणून खाऊ शकता. उन्हाळ्यात रोज एक काकडी खावी.

Summer Drinks
Summer Skin care: उन्हाळ्यात फक्त या ५ गोष्टींच्या मदतीने त्वचा होईल चमकदार आणि तरुण

लिंबाचा रस

उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासोबतच व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करण्यासाठी लिंबाचा रस उत्तम आहे. बाजारात तुम्हाला किमान ३ लिंबू १० रुपयांना मिळतील. अर्ध्या लिंबाची शिकंजी किंवा इतर पेय दिवसातून एकदा प्या आणि उन्हाळ्यात हायड्रेटेड राहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com